हवेत उडणारं शॉपिंग मॉल, हॉटेल आणि स्वीमिंग पूल; बघा या अनोख्या विमानाचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:30 IST2022-06-27T17:29:00+5:302022-06-27T17:30:25+5:30
Flying Hotel : कॉन्सेप्ट व्हिडीओनुसार, हे उडणारं हॉटेल एकप्रकारचं विमान असेल, जे कधीच जमिनीवर लॅंड करणार नाही. यात 5 हजार प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असेल. या उडणाऱ्या हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतील.

हवेत उडणारं शॉपिंग मॉल, हॉटेल आणि स्वीमिंग पूल; बघा या अनोख्या विमानाचा व्हिडीओ
Flying Hotel : आकाशात उडणारी विमानं तर तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण तुम्ही कधी उडणारं हॉटेल पाहिलं का? अर्थातच याच उत्तर नाही असेल. मात्र, ज्याप्रमाणे विज्ञान प्रगती करत आहे, त्यानुसार तो दिवस दूर नाही तेव्हा तुम्ही उडणारं हॉटेलही बघू शकाल. एका व्हिडीओत याची एक झलक बघायला मिळाली.
हाशेम अल-घैली नावाच्या यूट्यूब चॅनलवर उडणाऱ्या हॉटेलचा कॉन्सेप्ट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो बघून लोक अवाक् झाले आहेत. व्हिडीओनुसार, ती वेळही येणार जेव्हा Nuclear Powered Sky Hotel मध्ये लोक मजा-मस्ती करतील.
कॉन्सेप्ट व्हिडीओनुसार, हे उडणारं हॉटेल एकप्रकारचं विमान असेल, जे कधीच जमिनीवर लॅंड करणार नाही. यात 5 हजार प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असेल. या उडणाऱ्या हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतील.
व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे या उडणाऱ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरन्ट, एक विशाल शॉपिंग मॉलसोबतच जिम, थिएटर आणि स्वीमिंग पूल असेल.
व्हिडीओत सांगण्यात आलं की, हे Flying Hotel आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने चालवलं जाणारं एक क्रूज असेल, ज्यात 20 इंजिन असतील. सगळेच इंजिन न्यूक्लिअर फ्यूजनच्या मदतीने चालतील. प्लेनला काही अशाप्रकारे डिझाइन केलेलं असेल की, हे जमिनीवर कधी उतरणारच नाही.
सामान्य एअऱलाइन कंपन्याचे विमान प्रवाशांना या Flying Hotel पर्यंत नेतील आणि हवेतच ते त्यात प्रवेश करतील. या विमानाच्या मेंटनेन्सचं कामही हवेतच होईल. यूट्यूबरने दावा केला की, अणु उर्जेवर चालणारं हे स्काय क्रूज भविष्य होऊ शकतं.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, भलेही हा प्रोजेक्ट मोठा आणि अनोखा आहे. पण काही लोक यावर टिकाही करत आहेत. त्यांचं मत आहे की, हे अणु उर्जेवर चालणार मग अपघात झाला तर मोठी दुर्घटना होईल.