Frenchman who died during sex on a business trip was victim of 'workplace accident', court rules | अनोळखी महिलेशी शारीरिक संबंध ठेवताना कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोर्टाने कंपनीला दिला दणका!
अनोळखी महिलेशी शारीरिक संबंध ठेवताना कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोर्टाने कंपनीला दिला दणका!

बिझनेस ट्रिपदरम्यान अनोळखी महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी एका फ्रेन्च कंपनीला जबाबदार ठरवण्यात आल्याची आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. या कर्मचाऱ्याला शारीरिक संबंध ठेवताना कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला होता.

२०१३ मधील ही घटना असून इतक्या वर्षांपासून कोर्टात हा खटला सुरू होता. पॅरिस येथील कोर्टाने या प्रकरणासंबंधी निर्णय दिला असून कर्मचाऱ्याचा मृत्यू इंडस्ट्रियल अ‍ॅक्सिडेन्ट असल्याचं सांगत कर्मचाऱ्याच्या परिवाराला नुकसान भरपाई मिळायला हवी, असंही कोर्टाने म्हटलं आहे. 

कंपनीने आपल्या बचावात सांगितले होते की, कर्मचारी त्याच्या हॉटेल रूममध्ये अनोळखी व्यक्तीसोबत असताना ऑफिसचं कोणतंही काम करत नव्हता.  मात्र, फ्रेन्च कायद्यानुसार, न्ययाधिशांनी निर्णय दिला की, कर्मचाऱ्याचा मृत्यू बिझनेस ट्रिपदरम्यान झाल्याने या मृत्यूला कंपनी जबाबदार आहे. Xavier X नावाची व्यक्ती TSO या कंपनीत इंजिनिअर होती. 

या व्यक्तीचा मृत्यू २०१३ मध्ये सेंट्रप फ्रान्समधील एका हॉटेलमध्ये झाला होता. मात्र, कंपनीने विमा कंपनीच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर याची कोर्टात सुनावणी झाली.

Web Title: Frenchman who died during sex on a business trip was victim of 'workplace accident', court rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.