Optical Illusion : 'या' चित्रात हत्तीचे किती पाय दिसताहेत?; डोळे चक्रावतील पण उत्तर काही बरोबर येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:53 IST2022-04-05T16:52:14+5:302022-04-05T16:53:27+5:30
हे चित्र पाहून अनेक जण गोंधळात पडले आहे. या चित्रात दिसत असलेल्या हत्तीला किती पाय आहेत हे समजणे अशक्य आहे.

Optical Illusion : 'या' चित्रात हत्तीचे किती पाय दिसताहेत?; डोळे चक्रावतील पण उत्तर काही बरोबर येणार नाही
Optical Illusion : हे चित्र पाहून अनेक जण गोंधळात पडले आहे. या चित्रात दिसत असलेल्या हत्तीला किती पाय आहेत हे समजणे अशक्य आहे. काही लोक म्हणतात की हत्ती तो ४ पायांवर चालतो म्हणून याला चार पाय आहेत. तर अनेकांनी सांगितलं की चित्रात असलेल्या हत्तीला ५ पाय आहेत. चित्रात तुम्हाला हत्तीचे किती पाय दिसतायत? काही लोकांना या प्रश्नाचं उत्तर अशक्य वाटतं. तुम्हीही या चित्राकडे नीट पाहा आणि सांगा की या हत्तीला नेमके किती पाय आहेत.
खरं तर, या चित्राशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हीही थोडं गोंधळून गेला असाल. कारण कलाकाराने हत्तीचं हे चित्र अतिशय चतुराईने बनवलं आहे. या चित्रामध्ये फक्त हत्तीचा मागील डाव्या बाजूचा पाय योग्यरित्या रेखाटण्यात आला आहे. तो पाय योग्य रित्या दिसत आहे. परंतु अन्य पाय त्यात नीट समजत नाहीत.
जर तुम्ही हे चित्र निरखून पाहिलं तर यात असलेल्या हत्तीचे अन्य पाय पूर्णपणे रेखाटलेच नसल्याचं दिसेल. कलाकारानं हत्तीच्या पायांऐवजी त्याच्या पायाची प्रतिमा पायांदरम्यान ठेवली आहे. त्यामुळे लोकांना गोंधळवण्यासाठी कलाकारानं हे चित्र किती हुशारीनं काढलंय हे पाहिलंच असेल. या चित्रातील हत्तीला ४ पाय आहेत की पाच हे सांगणं मात्र अवघड आहे.