हॉटेलमधील बेडखाली फेकाल एक पाण्याची बॉटल तर रहाल सुरक्षित, कसे ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:44 IST2023-06-13T17:42:50+5:302023-06-13T17:44:20+5:30
सोशल मीडियावर एका डच एअरलाइनच्या एअरहोस्टेसने लोकांना एक सुरक्षेसंबंधी एक टिप सांगितली आहे.

हॉटेलमधील बेडखाली फेकाल एक पाण्याची बॉटल तर रहाल सुरक्षित, कसे ते जाणून घ्या!
बरेच लोक वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरांमध्ये जातात. तिथे थांबायचं काम पडलं तर ते एखाद्या हॉटेलमध्ये थांबतात. हॉटेलमध्ये थांबणं कधी सुरक्षित तर कधी असुरक्षित असतं. अनेक हॉटेल्सच्या रूममध्ये हिडन कॅमेरे लावले जातात. अशात तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. तशा तर अनेक आयडिया असता ज्याद्वारे तुम्ही हिडन कॅमेरे शोधून काढू शकता. पण अनेकदा तुमची प्रायव्हसी केवळ हिडन कॅमेरानेच धोक्यात येते असं नाही.
सोशल मीडियावर एका डच एअरलाइनच्या एअरहोस्टेसने लोकांना एक सुरक्षेसंबंधी एक टिप सांगितली आहे. तिने लोकांना सांगितलं की, जेव्हा कधी हॉटेलमध्ये थांबाल तेव्हा सगळ्यात आधी गपचूपपणे तुमच्या बेडखाली एक पाण्याची बॉटल फेका. ही आयडिया तुम्हाला सुरक्षित राहण्यास मदत करेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पाण्याच्या बॉटलने कशी सुरक्षा होईल. फ्लाइट अटेंडेंट एस्थेरने याबाबत डिटेलमध्ये सांगितलं. तिला नेहमीच कामानिमित्ताने हॉटेलमध्ये थांबावं लागतं आणि ती नेहमी बेडखाली पाण्याची एक बॉटल फेकते.
जशी तुम्ही पाण्याची बॉटल बेडखाली फेकाल, तेव्हा बेडखाली कुणी आधीच लपून बसलेलं असेल तर तुम्हाला लगेच कळेल. जर खाली कुणीच नसेल तर पाण्याची बॉटल दुसऱ्या बाजूने बाहेर येईल. याशिवायही तिने अनेक ट्रिक्स शेअर केल्या आहेत. तिने सांगितलं की, ती नेहमी हॉटेलच्या रूमच्या लॉकरमध्ये तिची चप्पल किंवा शूज ठेवत होती. जेणेकरून हॉटेलमधून जाताना आठवण रहावी की, आपल्या किंमती वस्तू लॉकरमधून बाहेर काढाव्या. लोकांना एस्थेरच्या या आयडिया खूप आवडत आहेत.