बोअर खोदताना जमिनीतून पाण्याऐवजी निघाल्या आगीच्या ज्वाला; मशीन जळून खाक, काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:35 PM2021-10-19T12:35:38+5:302021-10-19T12:37:05+5:30

पन्ना जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअर खोदण्याचं काम सुरू होतं. शासकीय निधीतून शाळेसाठी बोअर पाडण्यात येत होती

Fire from the ground instead of water while digging a bore; Machine burn at madhya pradesh | बोअर खोदताना जमिनीतून पाण्याऐवजी निघाल्या आगीच्या ज्वाला; मशीन जळून खाक, काय आहे प्रकार?

बोअर खोदताना जमिनीतून पाण्याऐवजी निघाल्या आगीच्या ज्वाला; मशीन जळून खाक, काय आहे प्रकार?

Next
ठळक मुद्दे५० फूट खोदकाम केल्यानंतर जमिनीतून पाण्याऐवजी आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या.ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर आसपासचे लोक बघण्यासाठी घटनास्थळी आलेअनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या गाड्यांना यश

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका शाळेत बोअर मशीनने पाणी काढण्यासाठी खोदकाम सुरू होतं तेव्हा पाण्याऐवजी चक्क आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्याने मोठी खळबळ माजली. घडलेल्या प्रकारात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही परंतु बोअर मशीनचं प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं दिसून आले.

पन्ना जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअर खोदण्याचं काम सुरू होतं. शासकीय निधीतून शाळेसाठी बोअर पाडण्यात येत होती. त्याचवेळेला घडलेल्या प्रकाराने उपस्थितांना मोठा धक्का बसला. ५० फूट खोदकाम केल्यानंतर जमिनीतून पाण्याऐवजी आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. काहीही कळण्याच्या आधीच आगीने भयानक रुप घेत बोअर मशिनला विळख्यात घेतलं. त्यात बोअर मशिनला लागलेल्या आगीत मशिनचं नुकसान झालं.

घटनास्थळी फायर ब्रिगेड पोहचलं

ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर आसपासचे लोक बघण्यासाठी घटनास्थळी आले. तिथे लोकांची गर्दी झाली. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती गुनौर पोलीस आणि प्रशासनाला दिली. तेव्हा तात्काळ अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. फायर ब्रिगेडने बोअर मशिनला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आणखीच वाढत होती. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या गाड्यांना यश आलं.

याबाबत अधिकारी पीयूष मिश्रा म्हणाले की, कथितपणे घटनास्थळाच्या जमिनीखालून गॅस अथवा पेट्रोल, डिझेलसारखे पदार्थ उपलब्ध असतील त्यामुळे याठिकाणी आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या जागेची जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करण्यात येत आहे. ही आग कशी लागली याचा शोध घेण्यात येत आहे. या संपूर्ण दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. परंतु जमिनीखालून बोअरमध्ये लागलेल्या आगीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या जागेत नैसर्गिक गॅसचा साठा आहे का? हे पाहण्यासाठी वैज्ञानिकांचे एक पथकही येथे येणार असल्याचं सांगण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी या परिसरात येण्यास स्थानिकांना मज्जाव घातला आहे. परंतु हे दृश्य पाहण्यासाठी घटनास्थळी आसपासच्या लोकांची गर्दी जमली होती.

Web Title: Fire from the ground instead of water while digging a bore; Machine burn at madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.