बोंबला! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली अंगठी, काढता काढता फायर फायटरच्या नाकी आले नऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 01:34 PM2021-07-26T13:34:59+5:302021-07-26T13:42:19+5:30

एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून एक स्टेनलेस धातुची अंगठी कापण्यासाठी ब्रिटनच्या एका हॉस्पिटलमध्ये फायर फायटर क्रू बोलवण्यात आलं.

Fire fighter crew was called to a hospital in the UK to cut a stainless metal ring off a mans penis | बोंबला! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली अंगठी, काढता काढता फायर फायटरच्या नाकी आले नऊ!

बोंबला! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली अंगठी, काढता काढता फायर फायटरच्या नाकी आले नऊ!

googlenewsNext

अंगठी बोटात घालण्याची वस्तू आहे आणि त्याचं आपलं वेगळं महत्व आहे. पण जर हिच वस्तू एखाद्या व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली तर? अशीच एक धक्कादायक आणि विचित्र घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने हा कारनामा केला आणि त्यानंतर त्याला मरणाचा त्रास झाला होता. तो त्रासाने तडपू लागला होता. मीडिया रिपोर्टनुसार, एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून एक स्टेनलेस धातुची अंगठी कापण्यासाठी ब्रिटनच्या एका हॉस्पिटलमध्ये फायर फायटर क्रू बोलवण्यात आलं.

हडर्सफील्ड रॉयल इनफर्मरीच्या डॉक्टरांनी २२ जुलैला हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या या व्यक्तीच्या मदतीसाठी वेस्ट यॉर्कशायर फायर अॅन्ड रेस्क्यू सर्व्हिसच्या टेक्नीकल बचाव सेवेला बोलवलं. क्रू ने धातुची अंगठी कापण्यासाठी एक खास उपकरणाचा वापर केला. ज्यानंतर या व्यक्तीला वेदनेतून सुटका मिळाली. (हे पण वाचा : Shocking! हस्तमैथुन करताना लॉकमध्ये अडकला प्रायव्हेट पार्ट आणि मग.....)

Former Huddersfield GP स्टुअर्ड ओलिवर यांनी सांगितलं की, 'मला नाही माहीत की, या व्यक्तीने असं का केलं असेल. पण मला असं वाटतं की, त्याने हे तणाव कायम ठेवण्याच्या मदतीसाठी केलं असेल'. ते पुढे म्हणाले की, 'हे अविश्वसनीय प्रकारे वेदनादायी राहिलं असेल आणि अशावेळी अंगठी लवकरात लवकर काढणं गरजेचं होतं. नाही तर गॅंगरीन विकसित होण्याचा धोका असतो'.

एकाने धातुचा नट फिट केला होता

अशीच एक विचित्र घटना हॉंगकॉंगमधून समोर आली होती. इथे एका व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर धातुचा एक नट फिट केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, ३४ वर्षीय व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणण्याआधी ताप आला होता आणि त्याला वेदना होत होत्या. धातुचा नट बाजूला करण्याची प्रक्रिया सोपी नव्हती. हा धातुचा नट कापण्यासाठी डायमंड डिस्क कटरचा वापर केला गेला. 
 

Read in English

Web Title: Fire fighter crew was called to a hospital in the UK to cut a stainless metal ring off a mans penis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.