महिलांना फसवून 'तो' डॉक्टर झाला ४८ मुलांचा बाप!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 03:54 PM2019-04-20T15:54:08+5:302019-04-20T15:56:15+5:30

स्पर्म डोनेशन याबाबत तुम्ही ऐकलंही असेल आणि विकी डोनर सिनेमाही तुम्ही पाहिला असेलच. याचसंबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

An fertility doctor used own sperm to artificially inseminate his patients without consent | महिलांना फसवून 'तो' डॉक्टर झाला ४८ मुलांचा बाप!

महिलांना फसवून 'तो' डॉक्टर झाला ४८ मुलांचा बाप!

Next

स्पर्म डोनेशन याबाबत तुम्ही ऐकलंही असेल आणि विकी डोनर सिनेमाही तुम्ही पाहिला असेलच. याचसंबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने अपत्यप्राप्ती न होणाऱ्या दाम्प्त्यांना मदत करण्यासाठी त्याच्या स्पर्मचा वापर केला. पण धक्कादायक बाब म्हणजे यासाठी त्याने त्याच्या क्लाइंट्सची परवानगीच घेतली नव्हती. 

डॉक्टरचा कारनामा

नेदरलॅंडमध्ये एका डॉक्टरने फारच विचित्र कारनामा केला. ज्या डॉक्टरबाबत हा खुलासा झाला आहे तो आता जिवंत नाही. डॉ. जन करबात क्लाइन नावाचा हा डॉक्टर २०१७ मध्ये मरण पावला. याच्यासोबत अशी माहिती समोर आली की, हा डॉक्टर त्याच्या क्लिनिकमध्ये डोनेट करण्यात आलेले स्पर्म बदलून त्याजागी त्याचे स्पर्म ठेवत होता. असं करुन तो आयवीएफ टेक्निकच्या माध्यमातून ४९ बाळांचा पिता झाला. तसेच ही सुद्धा चर्चा आहे की, बेकायदेशीर कामांमुळे २००९ मध्येच या डॉक्टरचं क्लिनीक बंद करण्यात आलं होतं. 

कसं आलं समोर?

क्लाइनचं क्लिनिक नेदरलॅंडमध्ये रोटर्डमजवळील बिजडोर्प शहरात होतं. टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरच्या या कारनाम्याचा खुलासा नुकत्याच करण्यात आलेल्या एका डीएनए टेस्टनंतर झाला. एका सामाजिक संस्थेच्या मागणीनंतर कोर्टाने डीएनए टेस्टला परवानगी दिली होती. ही संस्था या क्लिनिकमध्ये जन्माला आलेल्या मुलांच्या आणि आई-वडिलांच्या सांगण्यावरून हे काम करत होती. 

काय आहे प्रकरण?

डॉक्टर क्लाइनशी संबंधित हा सगळा कारनामा याच वर्षी फेब्रुवारीमध्ये समोर आला होता. जेव्हा डच कोर्टाने प्रकरणाची माहिती मिळताच डॉक्टरच्या आणि मुलांच्या डीएनएची टेस्ट करण्याची परवानगी दिली होती. डॉक्टर विरोधात पहिल्यांदा कोर्टात २०१७ मध्ये तक्रार करण्यात आली होती. या क्लिनिकमध्ये जन्माला आलेल्या मुलांनी आणि त्यांच्या आई-वडिलांनी व डॉक्टरांच्या एका समूहाला डॉक्टरवर संशय आल्यावर ही तक्रार करण्यात आली होती. संशय येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इथे जन्माला आलेल्या सर्वत मुला-मुलींचे मिळते जुळते चेहरे आणि त्यांच्या सवयी. यातील एक मुलगा डॉक्टरसारखाच दिसत होता. 

डॉक्टरचा जबाब ठरला कारण

रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये मृत्यूपूर्वी डॉक्टर करबातने एक जबाब नोंदवला होता. त्यामुळेही त्याच्यावर संशय आला होता. त्याने सांगितले होते की, तो ६० पेक्षा जास्त अपत्यांचा पिता झाला आहे. असेही म्हटले जात आहे की, डॉक्टरने स्वत: कबुली दिली होती की, त्याने अनेकदा डोनेट केलेल्या स्पर्मच्या जागी त्याचे स्पर्म ठेवले होते. करबातच्या स्पर्मच्या माध्यमातून जन्माला आलेल्या काही मुलांचं म्हणणं आहे की, त्यांना डॉक्टर त्यांचे पिता असल्याचा राग नाहीये, राग आहे तो डॉक्टरने त्यांच्या आईंची केलेल्या फसवणुकीची.

Web Title: An fertility doctor used own sperm to artificially inseminate his patients without consent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.