1963 मधील फरारीवर आत्तापर्यंतची सर्वात जास्त बोली, किंमत वाचून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 16:20 IST2018-06-08T16:18:01+5:302018-06-08T16:20:10+5:30
मग त्या कार नवीन असो वा जुन्या. नुकतीच अशाच एका जुन्या कारवर कोट्यवधींची बोली लागली.

1963 मधील फरारीवर आत्तापर्यंतची सर्वात जास्त बोली, किंमत वाचून व्हाल थक्क!
(Image Credit: YouTube Grab)
मुंबई : वेगवेगळ्या कार्सचा आवड असणाऱ्या अनेकांबाबत तुम्ही ऐकलं असेल. हे लोक अव्वाच्या सव्वा किंमत देऊन त्यांना पसंत असलेल्या कार विकत घेतात. मग त्या कार नवीन असो वा जुन्या. नुकतीच अशाच एका जुन्या कारवर कोट्यवधींची बोली लागली.
अबब किती ही किंमत?
सीएनबीसी डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, 1963 सालातील एक फरारी 250 जीटीओ ही कार जुने सगळे रेकॉर्ड मोडत जगातली सर्वात महागडी कार ठरली आहे. अमेरिकेतील एका उद्योगपतीने ही कार 70 मिलियन डॉलर म्हणजेच 469 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या कारचा चेसिस नंबर 4153 जीटी असल्याची माहिती आहे.
अमेरिकेतील या व्यापाऱ्याचं नाव डेव्हिड मॅकनेल असून तो डेविड कार अॅक्सेसरीज तयार करणारी फर्म वेदरटेकचे चीफ एक्झिक्युटीव्ह आहे. त्यांच्याबाबत सांगितलं जातं की, ते फरारी कारचे शौकीन आहेत. यावेळी त्यांनी 1963 मध्ये तयार करण्यात आलेल्या फरारी 250 जीटीओ आपल्या कलेक्शनमध्ये सहभागी करुन घेतली आहे.
याआधी सर्वाधिक किंमत मिळाल्याचा रेकॉर्ड 2014 मध्ये झाला होता. अशाच एका लिलावात एक 250 जीटीओ कार 38 मिलियन डॉलरला म्हणजेच 254 कोटी रुपयांना विकली गेली होती. एका अंदाजानुसार आत्तापर्यंत सर्वात जास्त किंमतीला विकल्या गेलेल्या कार्समध्ये 10 पैकी 7 कार इटालियन कारमेकरच्या होत्या. त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे यातील 3 कार या 250 जीटीओच होत्या.