जेवणाचे बिल झाले 3700 रुपये, ग्राहकाने टिप म्हणून दिले 62 हजार; महिला वेटर झाली मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 14:39 IST2022-05-13T14:37:20+5:302022-05-13T14:39:03+5:30
female waiter recieve rs 62000 tip : द बिग चीज अँड पब (The Big Cheese & Pub) नावाचे रेस्टॉरंट आहे. जे अमेरिकेच्या रोड आयलँडच्या क्रॅन्स्टन शहरात स्थित आहे.

जेवणाचे बिल झाले 3700 रुपये, ग्राहकाने टिप म्हणून दिले 62 हजार; महिला वेटर झाली मालामाल!
20 वर्षांपासून रेस्टॉरंट इंडस्ट्रीत काम करणाऱ्या जेनिफर व्हर्नांसिओला (Jennifer Vernancio) लाइफटाइम टीप मिळाली. गेल्या आठवड्यात म्हणजेच 7 मे रोजी जेनिफर ही सकाळी तिचे पहिले टेबल सर्व्ह करत होती, तेव्हा तिला 48.17 डॉलरच्या बिलावर 810 डॉलरची टीप मिळाली, हे पाहून तिला आश्चर्य वाटले.
यासंदर्भात जेनिफर व्हर्नांसिओ हिने 'एनबीसी 10 डब्ल्यूजेएआर'सोबत संवाद साधला. आजचा दिवस कठीण होता, कारण मला माझ्या तीन वर्षांच्या मुलासाठी बेबीसिटर शोधण्यात यश मिळाले नाही. मात्र, एक अतिशय छान गृहस्थ आणि त्यांच्या पत्नीने माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम दिवस बनवला. त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त टीप दिली, असे जेनिफर व्हर्नांसिओ हिने यावेळी सांगितले. तसेच, या घटनेची आठवण करून देताना, जेनिफर व्हर्नांसिओ म्हणाली की, जेव्हा तिने टीप पाहिली तेव्हा ती स्तब्ध झाली, लगेच तिच्या व्यवस्थापकाकडे गेली आणि त्यांना याबद्दल सांगितले.
द बिग चीज अँड पब (The Big Cheese & Pub) नावाचे रेस्टॉरंट आहे. जे अमेरिकेच्या रोड आयलँडच्या क्रॅन्स्टन शहरात स्थित आहे. या रेस्टॉरंटच्या फेसबुक पेजवर बिलाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये टीपची रक्कम नमूद करण्यात आली होती. बिलाच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'ग्रेटफुल, चांगले लोक आपल्यामध्ये फिरत राहतात आणि त्यासाठी आम्ही आभारी आहोत. त्यांच्या उदारतेबद्दल धन्यवाद!'
दरम्यान, 20 वर्षे रेस्टॉरंट इंडस्ट्रीत काम केले आहे आणि तो माझ्यासाठी आजवरचा सर्वोत्तम दिवस होता, असे जेनिफर व्हर्नांसिओने एनबीसी 10 डब्ल्यूजेएआरला सांगितले. तसेच, ती म्हणाली, 'त्या गृहस्थाने आणि त्यांच्या पत्नीने मला मोठी टीप दिली. मला फक्त धन्यवाद म्हणायचे आहे. हे माझ्यासाठी खूप आहे.'