पत्नीला अफेअरबाबत समजू नये म्हणून पतीने मुलीचं असं ठेवलं नाव, तरी झाला त्याचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 12:32 IST2021-07-14T12:31:38+5:302021-07-14T12:32:27+5:30

तरूणीने सांगितलं की, जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी हॉस्पिटलमधील कागदपत्रांवर क्रीस्टीना नाव लिहिलं. तिच्या आईचा या नावावर काहीच आक्षेप नव्हता.

Father names daughter after woman he was having affair to avoid getting caught | पत्नीला अफेअरबाबत समजू नये म्हणून पतीने मुलीचं असं ठेवलं नाव, तरी झाला त्याचा भांडाफोड

पत्नीला अफेअरबाबत समजू नये म्हणून पतीने मुलीचं असं ठेवलं नाव, तरी झाला त्याचा भांडाफोड

आपल्या बाळाचं नाव ठरवण्यासाठी आई-वडील अनेकदा विचारात पडतात. बाळाचं नाव ठरवण्यासाठी ते सामान्यपणे आपले आदर्श आणि विचारांना निवडतात. तर काही लोक आपल्या बाळाचं नाव असं ठेवतात जे फार वेगळं असेल. मात्र, एका व्यक्तीने आपल्या मुलीचं नाव त्याचा गर्लफ्रेन्डच्या नावावर ठेवलं. जेणेकरून त्याच्या अनैतिक संबंधाचा खुलासा घरी होऊ नये.

त्याने असं करूनही मुलीच्या जन्माच्या काही महिन्यांनंतर त्याचं गुपित उघड झालं आणि त्यानंतर घरात वादळ आलं. आपल्या नावाबाबतचा खुलासा स्वत: या व्यक्तीच्या मुलीने केला आहे. तिचंच नाव त्याने गर्लफ्रेन्डच्या नावावरून ठेवलं होतं. एका टिकटॉक व्हिडीओमध्ये तिने सांगितलं की, जेव्हा ती होणार होती तेव्हा तिच्या आई-वडिलांनी ठरवलं होतं की, मुलगा झाला तर आई त्याचं नाव ठेवेल आणि मुलगी झाली तर बाबा तिची नाव ठेवतील.

गुपित उघड झालंच...

तरूणीने सांगितलं की, जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी हॉस्पिटलमधील कागदपत्रांवर क्रीस्टीना नाव लिहिलं. तिच्या आईचा या नावावर काहीच आक्षेप नव्हता. कारण तिला हे माहीत नव्हतंच की, पतीने मुलीचं हे नाव का निवडलं. सगळं काही ठीक सुरू होतं. काही महिन्यांनी आईला समजलं की, तिचा पती तिला दगा देत आहे आणि त्याने मुलीचं नाव क्रीस्टीना ठेवलं कारण घरात चुकून त्याने प्रेयसीचं नाव घेतलं तर तो पकडला जाऊ नये. असं झालं तर तो सांगू शकेल की, तो मुलीबाबत बोलत होता.

पतीने गर्लफ्रेन्डच्या नावावरून मुलीचं नाव ठेवलं हे पत्नीला समजलं तेव्हा ती रागाने  संतापली होती. त्यानंतर जे होणार होतं त्याची केवळ कल्पना केली जाऊ शकते. ही घटना अमेरिकेच्या केंटुकीमधील आहे. क्रीस्टीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: Father names daughter after woman he was having affair to avoid getting caught