शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

बोंबला! पृथ्वीच्या अंताची वाट बघत ९ वर्षांपासून तळघरातच लपून होतं 'हे' कुटुंब, असा झाला खुलासा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 3:11 PM

२०१२ मध्ये पृथ्वी नष्ट होणार ही भविष्यवाणी फारच चर्चेचा विषय ठरत होती. अनेक लोकांनी पृथ्वीच्या अंताची ही गोष्टी खरीही मानली होती आणि यातून जिवंत कसे राहता येईल, याबाबत विचारही करू लागले होते.

(Image Credit : mirror.co.uk)

२०१२ मध्ये पृथ्वी नष्ट होणार ही भविष्यवाणी फारच चर्चेचा विषय ठरत होती. अनेक लोकांनी पृथ्वीच्या अंताची ही गोष्टी खरीही मानली होती आणि यातून जिवंत कसे राहता येईल, याबाबत विचारही करू लागले होते. पण असं काही झालं नाही. लोकांना हे कळालं की, भविष्यवाणी चुकीची होती. असं असूनही काही लोक असेही होते ज्यांच्यानुसार पृथ्वी कोणत्याही दिवशी नष्ट होऊ शकते. म्हणून त्या दिवसासाठी तयार रहायला हवं. अशाच एका परिवाराची घटना समोर आली आहे. या परिवाराने पृथ्वीच्या अंताची वाट पाहत तब्बल नऊ वर्षे तळघरात घालवली.

mirror.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना नेदरलॅंडची राजधानी एम्सटर्डॅमपासून १४० किलोमीटर अंतरावरील ड्रेन्थ प्रांतातील रूइनरवर्ल्ड गावातील आहे. इथे एका फार्महाउसच्या तळघरात एक डच कुटूंब नऊ वर्षांपासून पृथ्वी नष्ट होण्याची वाट बघत होतं. या परिवारात ५८ वर्षीय एक वयोवृद्धांसोबत १६ ते २५ वयोगटातील सहा मुलंही होते. यातील एक २५ वर्षांचा तरूण फार्महाउसमधून पळून जाण्यात यशस्वी ठरला. तो पळून जवळच्या एका बारमध्ये गेला आणि त्याने बिअरबारच्या मालकाकडे मदत मागितली. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. बार मालकाने लगेच पोलिसांनी याची माहिती दिली. 

(Image Credit : mirror.co.uk)

बारचा मालक क्रिसने सांगितले की,  २५ वर्षीय तरूण बारमध्ये आणि तो पाच बिअर प्यायला. त्यानंतर त्याने सांगितले की, तो घरून पळून आला आहे आणि त्याला मदत हवी आहे. त्यानंतर क्रिसने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यावर पोलीस लगेच फार्महाउसवर पोहोचले. पोलिसांना ५८ वर्षीय जेन जॉन डोर्सटन नावाची व्यक्ती झोपलेली आढळली. त्याच्यासोबत काही मुलंही होती.

पोलिसांनी डोर्सटनला चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले, पण त्याने मदत न केल्याने त्याला अटक केली. तपासातून समोर आलं की, परिवार फार्महाउसमध्ये भाज्या उगवून आणि प्राणी पाळून आपलं पोट भरत होते. मुलांमध्ये आणि त्या वृद्ध व्यक्तीमध्ये काय संबंध आहे हे अजून समजलं नाही. पोलिसांनी डोर्टनसला मुलांचे वडील मानलं नाही.

(Image Credit : bbc.com)

पोलिसांनी सांगितले की, चौकशी अजून सुरू आहे आणि यापेक्षा जास्त माहिती दिली जाऊ शकत नाही. या मुलांच्या आईबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. एका स्थानिकाने सांगितले की, त्यांनाही मुलांच्या आईबाबत काहीच माहीत नाही. येथील मेअर रोजर डि ग्रूट यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच असं काही पाहिलं नाही. ही अशाप्रकारची पहिलीच घटना आहे. 

बारचा मालक वेस्टबीक म्हणाला की, २५ वर्षीय तरूणाची दाढी फार जास्त वाढलेली होती. त्याने अनेक महिन्यांपासून केसही कापले नव्हते. तो नऊ वर्षांपासून तळघरात होता आणि कधीच तळघरातून बाहेर आला नव्हता. त्याच्या भावा-बहिणीची सुद्धा स्थिती तशीच होती. तो त्या जीवनाला कंटाळला होता. त्याने सांगितले की, तो रात्री तळघरातून पळाला, कारण सकाळी त्याला पळून जाणं जमलं नसतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके