कमालच केली राव! नवरा नवरीला नातेवाईकांनी आहेर पाठवावा म्हणून कुटुंबानं पत्रिकेत केला जुगाड
By Manali.bagul | Updated: January 19, 2021 14:21 IST2021-01-19T14:13:47+5:302021-01-19T14:21:56+5:30
Trending Viral News in Marathi : एका लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशी लग्नपत्रिका यापुर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल.

कमालच केली राव! नवरा नवरीला नातेवाईकांनी आहेर पाठवावा म्हणून कुटुंबानं पत्रिकेत केला जुगाड
कोरोनाच्या माहामारीने सगळ्यांनाच न्यू नॉर्मलच्या साच्यात बंद केले आहे. कोरोना माहामारी आणि लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा परिणाम समारंभांवर दिसून आला. खासकरून अनेकघरांमध्ये लोकांनी साध्या पध्दतीने, शासनाच्या नियमांचे पालन करत लग्न उरकलं. सगळ्या नातेवाईकांना लग्नात सहभागी करून घेण्यासाठी ऑनलाईन, डिजीटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला. व्हाट्सअॅपवरून नातेवाईकांना पत्रिका पाठवण्यात आल्या तर अनेक ठिकाणी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लग्नाला हजेरी लावण्यात आली. अशाच एका लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशी लग्नपत्रिका यापुर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल.
A wedding invitation in Madurai with GPay & PhonePe QR Code for monetary contribution.
— D Suresh Kumar (@dsureshkumar) January 18, 2021
Next level Digital India!
மொய் நோட்டு எதற்கு.. கூகுள் பே இருக்கு..! வைரலாகும் புதுமண தம்பதியரின் புது ஐடியா...Read Morehttps://t.co/3rZbO0z6vmpic.twitter.com/fSGU59NtTq
तामिळनाडूच्या मदुरैमधील एका कुटुंबानं लग्न पत्रिकेवर गुगल पे आणि फोन पे चे QR कोड छापले आहेत. जेणेकरून जे लोक लग्नाला येऊ शकणार नाहीत. ते ऑनलाईन क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसै पाठवू शकतात. रिपोर्ट्नुसार शिवशंकरी आणि सरवनन यांनी कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेता आपल्या मित्र मैत्रिणींसाठी आणि नातेवाईकांसाठी लग्न पत्रिकेवर क्यूआर कोड लावण्याची संकल्पना राबवली. जवळपास ३० लोकांनी याचा वापर करत नवरा नवरींपर्यंत आपले आहेर पोहोचवले.
हे लग्न रविवारी पार पडलं असून सध्या या लग्नपकत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या कल्पनेचं भरभरून कौतुक केलं आहे. ही पत्रिका पाहिल्यानंतर नवरा- नवरीला आपल्या मित्र मैत्रिणींचे फोन यायला सुरूवात झाली. अरेरे! ४ वर्षांची चिमुरडी हरवली; अन् रिक्षा चालकाच्या प्रयत्नानं आई-बाबांना लेक सुखरूप मिळाली
New trend of marriage invitation. Marriage food will be delivered at your doorstep. pic.twitter.com/ooEz1qbsvP
— Shivani (@Astro_Healer_Sh) December 10, 2020
गेल्या महिन्यातही केरळमधील एक लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. या मंडळीने लग्नाचं जेवण आपल्या नातेवाईकांना घरपोच पुरवलं होतं. यासाठी त्यांनी चार रंगेबीरेगी बॅग्स आणि केळ्याची पानं पाठवली होती. खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग.....