नशीब असावं तर असं...! अचानक नोकरीवरून काढले पण २४ तासांत बनला कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 19:21 IST2023-08-22T19:21:04+5:302023-08-22T19:21:26+5:30

सध्या असाच एक व्यक्ती चर्चेत आहे ज्याच्या नशिबाने त्याला साथ दिली आणि एका क्षणात तो कोट्यधीश झाला.

Eric Abbott won $250,000 24 hours after losing his job | नशीब असावं तर असं...! अचानक नोकरीवरून काढले पण २४ तासांत बनला कोट्यधीश

नशीब असावं तर असं...! अचानक नोकरीवरून काढले पण २४ तासांत बनला कोट्यधीश

प्रत्येकाचं भाग्य इतकं चांगले नसते की तो श्रीमंत बनेल. पण काही लोकांचे नशीब इतकं जबरदस्त असते की कुठल्या ना कुठल्या रितीने ते श्रीमंत बनतात. भलेही त्याच्या आयुष्यात कितीही समस्या असो, अडचणी येवो परंतु जेव्हा कधीही त्याच्या नशीबाचे कुलुप उघडते तेव्हा त्याचे सर्व दु:ख, समस्या, अडचणी सर्वकाही एकाच झटक्यात दूर होते.

सध्या असाच एक व्यक्ती चर्चेत आहे ज्याच्या नशिबाने त्याला साथ दिली आणि एका क्षणात तो कोट्यधीश झाला. जेव्हा तुम्ही या व्यक्तीची कहाणी ऐकाल तेव्हा नशीब असावं तर असं...हे नक्की म्हणाल, या व्यक्तीचे नाव आहे एरिक एबॉट(Eric Abbott) तो अमेरिकेतील अरकंसास लोनोके इथं राहणारा आहे. डेली मेल रिपोर्टनुसार, मागील २० वर्षापासून तो नोकरी करत होता. परंतु अचानक एकेदिवशी त्याची नोकरी गेली. हा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. नोकरी जाण्याने तो खूप दुखी होता. परंतु त्याचं दु:ख जास्त काळ टिकले नाही.

अवघ्या २४ तासांत त्याच्या नशिबाचे दार उघडले. आयुष्याने असा टर्न घेतला ज्याने तो कोट्यधीश झाला. एरिकला २,५०,००० पाऊंड म्हणजे २ कोटी ६५ लाख रुपयांची लॉटरी लागली. जेव्हा एरिकला लॉटरी जिंकलेल्याचा ईमेल आला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. सुरुवातीला कुणीतरी त्याच्यासोबत मस्ती करतेय असं त्याला वाटले. परंतु जेव्हा एरिकने विजेत्यांची यादी पाहिली त्यात स्वत:चे नाव पाहून तो खूप खुश झाला. एरिकने सर्वात आधी लॉटरी जिंकल्याचे त्याचे आईवडील यांना सांगितले. मुलगा कोट्यधीश झाल्याने घरचेही आनंदी झाले.

जिंकलेल्या रक्कमेचे काय करणार?

एरिकने जिंकलेल्या रक्कमेतून सर्वात पहिले त्याच्यासाठी कार खरेदी केली. त्यानंतर उरलेल्या पैशातून त्याने कुटुंबाच्या गरजेनुसार खर्च केले. इतकेच नाहीतर एरिकने मित्रांवरही पैसे खर्च करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Eric Abbott won $250,000 24 hours after losing his job