शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हेअर डाय लावणं तरूणाला पडलं महागात, सकाळी फुग्यासारखा फुगला होता चेहरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:40 IST

Hair Dye Reaction : केसांना लावण्याआधी त्याने डायची पॅच टेस्ट केली नाही. म्हणजे थोड्या केसांना डाय लावून टेस्ट केली नाही. थेट पूर्ण केसांना त्याने डाय लावलं.

Hair Dye Reaction : आजकाल महिला असो वा पुरूष सगळ्यांनाच कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या होत असते. त्यामुळे लोक केस काळे करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. काही लोक डाय लावतात तर काही लोक केमिकल्सचा वापर करतात. याने केस काही दिवसांसाठी काळे तर होतात. पण यांचे काही साइड इफेक्ट्सही असतात. इंग्लंडमधील एका व्यक्तीवर हे साइड इफेक्ट्स दिसून आले. त्याने केस काळे करण्यासाठी डाय लावलं होतं. पण त्याच्यासोबत असं काही झालं ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल.

एका रिपोर्टनुसार, लॅंकशायरच्या ब्लॅकबर्नमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय यान ब्रिग्स गेल्या महिन्यात आईकडे गेला होता. त्याचे काही केस पांढरे झाले होते. अशात त्याच्या आईने त्याला केसांना लावण्यासाठी एक हेअर डाय दिलं. मात्र केसांना लावण्याआधी त्याने डायची पॅच टेस्ट केली नाही. म्हणजे थोड्यास केसांना डाय लावून टेस्ट केली नाही. थेट पूर्ण केसांना त्याने डाय लावलं.

सकाळी उठला तर....

त्याने केसांना डाय लावल्यावर जळजळ होऊ लागली होती. त्याला वाटलं की, हे असं होत असावं. रात्री त्याने डाय लावलं. सकाळी झोपेतून उठल्यावर त्याने आरसा बघितला तेव्हा त्याला धक्का बसला. त्याचं कपाळ, चेहरा पूर्ण सूजला होता. तरी तो ऑफिसला गेला. पण त्याला घरी परत पाठवण्यात आलं. कारण त्याची तब्येत बिघडली होती. तो लगेच डॉक्टरांकडे गेला. साइड इफेक्ट झाल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. 

काय होतं असं होण्याचं कारण?

जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठला तेव्हा त्याची हालत आणखी जास्त बिघडलेली होती. चेहरा आणखी जास्त सूजला होता. एका डोळ्याने तो बघूनही शकत नव्हता. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे टेस्ट केल्यावर समजलं की, त्याला paraphenylenediamine ने रिअॅक्शन झालं आहे. हे केमिकल हेअर डायमध्ये असतं. डॉक्टरांनी त्याला काही औषधं दिली. आता त्याची सूज उतरली असून तो बरा आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य