Video: हत्तीला अचानक आला राग, एका झटक्यात केले झाडाचे दोन तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 16:33 IST2021-08-24T16:31:35+5:302021-08-24T16:33:07+5:30

Social Viral: व्हिडिओत हत्तीचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे.

The elephant got angry, cut two pieces of tree in a few seconds | Video: हत्तीला अचानक आला राग, एका झटक्यात केले झाडाचे दोन तुकडे

Video: हत्तीला अचानक आला राग, एका झटक्यात केले झाडाचे दोन तुकडे

अनेकदा सोशल मीडियावर हत्तींचे मजेशीर आणि धोकादायक, अशा दोन्ही प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हत्तीचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. रागात आल्यावर हत्ती काय करू शकतो, हे या व्हिडिओतून तुम्हाला दिसेल. 

हत्तीचा हा व्हिडिओ @zubinashara नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हत्ती एका झाडाजवळ थांबला आहे आणि आपल्या सोंडेनं झाडाला हलवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी हत्ती इतका जोर लावतो की, काही सेकंदातच एका भल्यामोठ्या झाडाचे दोन तुकडे होतात. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेले की, हत्तीच्या अंगात किती शक्ती असते. या व्यतिरिक्त, हत्तींची कधीही छेड काढू नये आणि त्यांना त्रास देऊ नये, हे समजेल.
 

Web Title: The elephant got angry, cut two pieces of tree in a few seconds