शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भारीच! कोरोनामुळे नोकरी गेली अन् नाईलाजानं बिझनेस सुरू केला; आता  घेतोय लाखोंची कमाई

By manali.bagul | Updated: January 27, 2021 19:10 IST

Viral Trending News in Marathi : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. हातात आलेली नोकरी निघून गेली तरीही त्यानं हार मानली नाही.

(Image Credit- Dainik Bhaskar)

कोरोनाकाळात संपूर्ण जगभरातील लोकांच्या जीवनावर परिणाम झालेला दिसून आला. लॉकडाऊनच्या काळात सारं काही बंद असल्यानं अर्थव्यवस्थेवर ताण आला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कामधंदे मिळवणं कठीण झालं होतं. अशा स्थितीत अनेक तरूणांनी  घराची वाट धरून शेती  करायला सुरूवात केली तर अनेकांनी लहान मोठा बिझनेझ टाकला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका  होतकरू तरूणाबद्दल सांगणार आहोत. 

जम्मू काश्मीरचा रहिवासी असलेल्या नरेन सराफनं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्याचं स्वप्न ताज हॉटेलमध्ये नोकरी करण्याचं होतं. त्याची त्यासाठी निवडही झाली. मात्र नंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. हातात आलेली नोकरी निघून गेली तरीही त्यानं हार मानली नाही. दैनिक भास्करने याबाबतची माहिती दिली आहे. 

सुरूवातीला फक्त 2 महिनेच नरेनची नवी नोकरी चालली. आता मात्र तो महिन्याला  एक लाख रुपये कमावत आहे. २३ वर्षाच्या नरेनं सांगितले की, ''हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासादरम्यान तो इंटर्नशिपसाठी जोधपूरच्या उमेद भवनला गेला. तिथं त्याचं काम सगळ्यांना खूप आवडलं. तिथं त्याची प्रोफाईल बनवून ताज हॉटेलला पाठवली गेली. मार्च 2020 मध्ये नरेनची निवडही झाली. सप्टेंबरमध्ये त्याला तिथं जॉईन करायचं होतं. कोरोनामुळं ते सगळं राहून गेलं. हातात असलेली नोकरीही गेली.''गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO

नंतर त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपणच काही तरी बनवून लोकांना चाखायल देऊ.  त्यानंतर नरेनने  व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही पदार्थ बनवायला सुरूवात केली. त्याने बनवलेले पदार्थ लोकांना खूप आवडले. मग नंतर त्यानं स्वतःचं  हॉटेल सुरू करायचं ठरवलं. नरेननं 'आउट ऑफ द बॉक्स' नावाच्या एका रेस्टॉरंटची सुरूवात केली. खास मेन्यू तयार केला. त्यात नॉर्थ इंडियन व्हेज-नॉनव्हेज, साऊथ इंडियन, गाली स्टाइल फिश, कीमा राजमा असेही पदार्थ आहेत. यासह तरुणांच्या चवीला लक्षात घेऊन काबुली कबाब आणि बर्गरही तो बनवत असतो.

बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...

सुरूवातीला बिझनेस सुरू केल्यानंतर ओळखीच्या लोकांपर्यंत ऑर्डर पोहोचवायला सुरूवात केली. नंतर सोशल मीडियाद्वारे अजून ग्राहक त्यानं जोडले.  आता नरेनला जवळपास ८ ते १० ऑडर्स येतात. दिवसाला तीन चार  हजार  रूपये कमाऊन महिन्याला साधारण लाखो रुपये नरेन आता कमावतो.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल