प्रेयसीच्या कारमधून पडून प्रियकराचा मृत्यू, पत्नीनं मागितली ७० लाख रूपये नुकसान भरपाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:04 IST2025-01-07T14:03:19+5:302025-01-07T14:04:27+5:30
पत्नीला दगा देऊन एका व्यक्तीचं बाहेर अफेअर सुरू होतं. पण एक अशी घटना घडली की, त्याचा भांडाफोड झाला.

प्रेयसीच्या कारमधून पडून प्रियकराचा मृत्यू, पत्नीनं मागितली ७० लाख रूपये नुकसान भरपाई!
आजकाल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. अशात पत्नीला जेव्हा याची माहिती मिळते, तेव्हा संसार विस्कळीत होतो. कधी कधी तर अशाप्रकारचं खूप जास्त महागात पडतं. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
पत्नीला दगा देऊन एका व्यक्तीचं बाहेर अफेअर सुरू होतं. पण एक अशी घटना घडली की, त्याचा भांडाफोड झाला. व्यक्तीच्या अफेअरबाबत पत्नीला तेव्हा समजलं जेव्हा त्याचा त्याच्या प्रेयसीच्या कारमधून पडून मृत्यू झाला.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना २०२२ मधील आहे. वांग आडनाव असलेल्या एका व्यक्तीची भेट लियु नावाच्या तरूणीसोबत झाली होती. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. २०२३ मध्ये वांग आणि लियु यांच्या नातं संपवण्यावरून वाद झाला. दोघांनी रेस्टॉरन्टमध्ये जेवण केलं आणि नशेत कारनं जात होते. कार प्रेयसी चालवत होती आणि तर वांग नशेत बसून होता. अशात तो धावत्या कारमधून अचानक पडला. घाबरलेल्या प्रेयसीनं अॅम्बुलन्स बोलवून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण मेंदुला मारल्यानं २४ तासांनंतर त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी चौकशी केल्यावर समोर आलं की, वांग यानं सीटबेल्ट लावलाच नव्हता. त्यामुळे तो कारमधून पडला. यात त्याच्या प्रेयसीची काहीच चूक नव्हती. मात्र, आता वांगच्या पत्नीनं पतीच्या गर्लफ्रेन्डकडे ६ लाख युआन म्हणजेच २० लाख ३६ हजार रूपयांची नुकसान भरपाईची मागणी केली.
जेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचलं तेव्हा न्यायाधीशांनी महिलेच्या मागणीचं समर्थन केलं नाही. पण प्रेयसीला वांगच्या पत्नीला ८ लाख रूपये देण्याचा आदेश दिला. कोर्टानं प्रेयसीला वांगच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं नाही.