दारू पिऊन चार दिवस विहिरीत पडून होता पती, पत्नीने स्वेटरचा रंग बघून त्याला ओळखलं आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:32 IST2022-12-05T16:31:44+5:302022-12-05T16:32:04+5:30
Drunk Truck Driver: एक ट्रक ड्रायव्हर चार दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस जेव्हा त्याला शोधू शकले नाही तर त्यांनी त्याच्या पत्नीला बोलवलं आणि मग पत्नीने त्याला शोधून काढलं.

दारू पिऊन चार दिवस विहिरीत पडून होता पती, पत्नीने स्वेटरचा रंग बघून त्याला ओळखलं आणि....
Drunk Truck Driver: तळीरामांचे अनेक किस्से नेहमीच समोर येत असतात. हे लोक दारूच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांच्यासोबत काय-कसं होतं हेही त्यांना माहीत नसतं. अनेक दिवस हे लोक तर काही न खाता-पिता फक्त दारू ढोसत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ट्रक ड्रायव्हर चार दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस जेव्हा त्याला शोधू शकले नाही तर त्यांनी त्याच्या पत्नीला बोलवलं आणि मग पत्नीने त्याला शोधून काढलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा ट्रक ड्रायव्हर हाथरसचा राहणारा आहे. पण तो ट्रक घेऊन अलिगढला गेला होता. यादरम्यान तो खूप जास्त दारू प्यायला होता आणि रात्री एका हॉटेलजवळील विहिरीत पडला होता. नशेत त्याच्या लक्षात नाही आलं की, तो विहिरीत पडला आहे. तो सकाळी ट्रकजवळ पोहोचला नाही तर ट्रकचा मालक आणि काही लोक तिथे पोहोचले.
बराचवेळ शोध घेऊनही तो सापडला नाही तेव्हा पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनाही काही समजलं नाही तेव्हा त्यांनी ट्रक ड्रायव्हरच्या पत्नीला सूचना दिली. पत्नी सूचना मिळताच अलिगढला पोहोचली आणि तिने हॉटेलच्या आजूबाजूला त्याचा शोध सुरू केला. तिथे तिला एक कोरडी पडलेली विहीर दिसली. त्यात तिने वाकून पाहिलं तर तिला तिने हाताने विणलेलं स्वेटर दिसलं. तिने लगेच इतर लोकांना आवाज दिला.
तिने सगळ्यांना सांगितलं की, तिचा पती विहिरीत आहे. त्यानंतर लोकांनी मिळून त्याला कसंतरी बाहेर काढलं. सुदैवाने त्या विहिरीत पाणी नव्हतं. पण जेव्हा त्याला बाहेर काढलं तेव्हा तो बेशुद्ध होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता त्याची स्थिती बरी असल्याचं सांगण्यात आलं.