चालकाविना धावणारी दुचाकी पाहून Anand Mahindra ही हैराण, Video शेअर करत घेतली फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 13:30 IST2021-10-21T13:29:44+5:302021-10-21T13:30:10+5:30
सध्या Social Media वर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये बाईकवर पुढे कोणीही नाही पण मागे एक व्यक्ती बसून राईडचा आनंद घेत आहे.

चालकाविना धावणारी दुचाकी पाहून Anand Mahindra ही हैराण, Video शेअर करत घेतली फिरकी
महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra and Mahindra) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते आपल्या अकाऊंटवरून भन्नाट व्हिडीओ, फोटो शेअर करतात असतात. त्यांच्या या फोटोंना त्यांच्या फोलोअर्सचीही मोठ्या प्रमामात पसंती मिळते. अनेकदा ते आपल्या फॉलोअर्सना रिप्लायही देताना दिसतात. असाच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.
त्यांशी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोटरसायकलव वर विना चालक बसलेला दिसत असून ती बाईकही पुढे धावताना दिसत आहे. तसंच ती व्यक्ती या राईडचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. या मूळ व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं एलन मस्क यांना आम्हालाही भारतात चालकरहित वाहन हवं असल्याचं म्हटलंय.
Love this…Musafir hoon yaaron… na chalak hai, na thikaana.. https://t.co/9sYxZaDhlk
— anand mahindra (@anandmahindra) October 20, 2021
या व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे फार आवडलं... मुसाफिर हूं यारो.. ना चालक आहे ना ठिकाणा असं त्यांनी किशोर कुमार याचं गाणं मुसाफिर हूं यारो यावरून लिहिलं आहे. दरम्यान ५ लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात युझर्सच्या कमेंट्सही यावर आल्या आहेत.