पैसा, लक्झरी गाड्या, बंगलेवाले नाही; पाहा कसे लोक जगतात जास्त आनंदी जीवन, संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:17 IST2026-04-08T12:09:09+5:302026-04-08T12:17:02+5:30

रग्गड पैसा, लक्झरी गाड्या, बंगला, परदेश वाऱ्या, महागडे कपडे जास्त आनंद देतात असा समज लोक करून घेतात. पण असं खरंच असतं का?

Does wealth bring happiness know what study says about it | पैसा, लक्झरी गाड्या, बंगलेवाले नाही; पाहा कसे लोक जगतात जास्त आनंदी जीवन, संशोधनातून खुलासा

पैसा, लक्झरी गाड्या, बंगलेवाले नाही; पाहा कसे लोक जगतात जास्त आनंदी जीवन, संशोधनातून खुलासा

ढोबळमानाने पाहिलं तर श्रीमंत लोक खूप आनंदी असतात, असा एक समज लोकांमध्ये असतो. म्हणजे रग्गड पैसा, लक्झरी गाड्या, बंगला, परदेश वाऱ्या, महागडे कपडे जास्त आनंद देतात असा समज लोक करून घेतात. पण असं खरंच असतं का? याचं उत्तर मात्र कुणाला माहीत नसतं. याबाबत अलिकडेच एक रिसर्च समोर आलाय, ज्यात या विषयीचं सत्य मांडलं गेलंय. 

न्यूझीलँडच्या ओटागो यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांना आढळलं की, कोणताही तामझाम न करता साधं जीवन जगणारे लोक जास्त आनंदी आणि संतुष्ट जगतात. या संशोधनात १ हजारांपेक्षा जास्त लोकांच्या डेटाचं विश्लेषण केलं, ज्यात पुरूष आणि महिलांची संख्या बरोबर होती.   संशोधनात समोर आलं की, जे लोक प्रमाणापेक्षा जास्त वस्तू खरेदी करतात किंवा दिखावा करत नाहीत, ते त्यांच्या जीवनात जास्त संतुष्ट असतात. अशाप्रकारच्या जगण्याला वॉलेंटरी सिम्प्लिसिटी म्हणजे स्वेच्छेने साधं जीनव स्वीकारणं.  

साध्या जीवनात जास्त आनंद का? 

रिसर्चनुसार, जेव्हा लोक कमी गोष्टींसोबत जगण शिकतात, तेव्हा त्यांच्याकडे नाती आणि समाजासाठी जास्त वेळ असतो. त्यांना स्ट्रेस कमी जाणवतो आणि ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जास्त आनंद शोधत असतात. लोकांना भेटणं, संवाद साधणं अशा गोष्टीतून त्यांना आनंद मिळतो.  

पैसे आणि आनंदाचं सत्य 

रिसर्चच्या सह-लेखिका लीह वॉटकिन्स यांच्यानुसार, आजच्या जगात अनेकांना असं वाटतं की, जास्त पैसे आणि जास्त वस्तू या आनंदाचा मार्ग असतात. पण सत्य हे आहे की, भौतिक गोष्टी जास्त काळ आपल्याला आनंद देऊ शकत नाहीत. रिसर्चमधून असंही समोर आलं की, पुरूषांच्या तुलनेत महिला जास्त साधं जीवन जगतात. 

Web Title : खुशी सादे जीवन में, धन में नहीं: शोध से खुलासा।

Web Summary : शोध से पता चला है कि सादा जीवन भौतिक धन से अधिक खुशी लाता है। जो लोग संपत्ति से अधिक अनुभवों और रिश्तों को प्राथमिकता देते हैं, वे जीवन में अधिक संतुष्टि और कम तनाव की रिपोर्ट करते हैं। महिलाएं पुरुषों की तुलना में सादगी को अधिक अपनाती हैं।

Web Title : Happiness found in simple living, not wealth: Research reveals truth.

Web Summary : Research reveals simple living brings more joy than material wealth. Those prioritizing experiences and relationships over possessions report higher life satisfaction and reduced stress. Women embrace simplicity more than men.