हिरा चाटल्याने खरंच जीव जातो का? पाहा ही फक्त अफवा की काही आहे यात तथ्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:02 IST2026-04-06T16:01:26+5:302026-04-06T16:02:46+5:30
Diamond Licking Myth : आधुनिक विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर लक्षात येतं की, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. असं का म्हटलं जातं आणि हा विचार चुकीचा कसा आहे हे समजून घेऊ.

हिरा चाटल्याने खरंच जीव जातो का? पाहा ही फक्त अफवा की काही आहे यात तथ्य
Diamond Licking Myth : पूर्वीपासून चालत आलेल्या अशा अनेक भाकडकथा असतात, ज्यांची चर्चा आजही होते. अनेक पौराणिक कथा किंवा काही सिनेमांमध्ये दाखवलं जातं की, हिरा चाटल्याने मृत्यू होतो. पूर्वीपासून अनेकांनाही हे खरं वाटतं. पण जर आधुनिक विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर लक्षात येतं की, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. असं का म्हटलं जातं आणि हा विचार चुकीचा कसा आहे हे समजून घेऊ.
हिरे नसतात विषारी
वैज्ञानिक रूपाने पाहिलं तर हिरा जवळपास ९९.९५ टक्के शुद्ध कार्बनपासून बनलेला असतो. कार्बन हे एक असं तत्व आहे जे मानवी शरीरात आणि रोजच्या गोष्टी जसे की, जेवण आणि हवेत आढळतं. हिरा रासायनिक रूपाने निष्क्रिय असतो. म्हणजे शरीरातील तरल पदार्थ, अॅसिड किंवा मग एंझाइमसोबत प्रतिक्रिया करत नाहीत. याच कारणाने हिऱ्याला स्पर्श केल्या किंवा चाटल्याने विष पसरत नाही.
सगळ्यात कठोर पदार्थ
हिरा चाटल्याने काहीही नुकसान होत नाही. पण जर तो गिळला तर मग अडचण होईल. हिरा एका कठोर पदार्थ असतो. त्याचे कोपरे टोकदार असतात. जर हिरा गिळला तर त्याने आतील टिश्यूज फाटू शकतात. याने आतड्यांमध्ये छिद्र पडू शकतं, आत रक्तस्त्रावही होऊ शकतो. गिळलेला हिरा आतड्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. जर यावर वेळीच उपाय केला नाही जीवालाही धोका होऊ शकतो.
मग अफवा कशी पसरली?
हिरा चाटल्याने जीव जातो, या गोष्टीचा उल्लेख जास्तकरून ऐतिहासिक कथांमध्ये आढळतो. खासकरून प्राचीन भारतात असं म्हटलं जात होतं की, तेव्हा एखादी राणी परकीय आक्रमण किंवा पराभवादरम्यान स्वत:ला संपवण्यासाठी दागिन्यांमध्ये विष लपवून ठेवत होती. सामान्यपणे हिरेजडीत अंगठ्यांमध्ये विष ठेवलं जात होतं. काळानुसार हा संबंध असा जोडण्यात आला की, हिरा स्वत: जीवघेणा असतो.
हिऱ्यांवर केमिकल्स
एक प्रॅक्टिकल बाब ही आहे की, कच्चा किंवा नवीन कापलेल्या हिऱ्यांवर मायनिंग, कटिंग किंवा पॉलिशिंगदरम्यान वापरलेल्या केमिकल्सचे डाग असू शकतात. न धुतलेला हिरा चाटल्यास कुणी या शिल्लक राहिलेल्या केमिकल्सच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे हलकी जळजळ होऊ शकते. पण हिरा चाटल्याने जीव जातो हा मोठा गैरसमज आहे.