बापरे! मासेमारी करणं चांगलंच अंगाशी आलं, डॉक्टरांनी घश्यातून काढला ७ इंचाचा मासा, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:01 IST2021-02-01T18:44:00+5:302021-02-01T19:01:28+5:30
अनेकदा लोक खाता खाता खाण्यायोग्य नसलेल्या वस्तूही खातात अशावेळी आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता असते.

बापरे! मासेमारी करणं चांगलंच अंगाशी आलं, डॉक्टरांनी घश्यातून काढला ७ इंचाचा मासा, पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला शस्त्रक्रियेचा व्हिडीओ पाहून तुम्ही अस्वस्थ व्हाल. डॉक्टरांनी एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून वेगवेगळे पदार्थ शस्त्रक्रियेद्वारे काढल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. अनेकदा लोक खाता खाता खाण्यायोग्य नसलेल्या वस्तूही खातात अशावेळी आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता असते. शरीरात चुकीच्या ठिकाणी एखादा अन्नपदार्थ अडकून राहिल्यास मृत्यूचं कारणही ठरू शकतं. एक विलक्षण मासेमारी अपघातानंतर कोलंबियामधील डॉक्टरने मासेमारीला गेलेल्या एका माणसाच्या गळ्यातील ७ इंचाचा मासे काढून टाकल्याचे एक धक्कादायक फुटेज दिसून आले.
कोलंबियामधील हे धक्कादायक फुटेज समोर आलं आहे. मासेमारी करताना एका माणसाच्या घश्यात ७ इंचाचा मासा अडकला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून या माणसाच्या घश्यातील हा मासा काढण्यास मदत केली आहे. २३ जानेवारीला २४ वर्षांच्या तरूण मासेमारी करत असताना ही घटना घडली. एका माशावर ताबा मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर तरूणाच्या घश्यात हा मासा शिरला. हा मासा तोंडात शिरताच दातात अडकला. या घटनेनंतर तो माणूस स्वत: दवाखान्यात गेला पण तो नीट बोलू शकला नाही म्हणून आपली समस्या डॉक्टरांना सांगू शकला नाही. काय सांगता? ८ वर्षात ११६ मुलांचा पिता बनला; फेसबुकवर महिला करताहेत आई बनण्यासाठी विनंती
डॉक्टरांनी त्वरित स्कॅन करून मासे काढण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रक्रियेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्यामध्ये डॉक्टर एका माणसाच्या अन्ननलिकेमधून मासे काढून टाकत असल्याचे दर्शवितो. त्या व्यक्तीला 2 दिवसांपेक्षा जास्त काळ निरीक्षणासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. सुदैवाने, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. बोंबला! नवरा झोपला होता; अन् बायकोनं ऑनलाईन कपडे विकण्यासाठी त्यालाच बनवलं मॉडेल