बाबो! एक सूमो पेहलवान खातो चार लोकांचं जेवण, डाएटबाबत वाचूनच व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:50 IST2022-11-08T14:49:52+5:302022-11-08T14:50:23+5:30
सामान्यपणे जास्तीत जास्त लोक जास्त खाल्ल्यानंतर लठ्ठपणाचे शिकार होऊन सुस्त होतात. पण हे सूमो पेहलवान असं काय खातात, जे इतके लठ्ठ असूनही एनर्जेटिक राहतात.

बाबो! एक सूमो पेहलवान खातो चार लोकांचं जेवण, डाएटबाबत वाचूनच व्हाल अवाक्...
Do You Know What Sumo Wrestlers Eat: कधी काही लोक एखाद्या लठ्ठ व्यक्तीला भेटतात तेव्हा गमतीने त्याला सुमो पेहलवान म्हणतात. सुमो पेहलवान कसे असतात हे तुम्ही सिनेमात, टीव्हीवर पाहिलं असेलच. ते केवऴ लठ्ठच नाही तर एनर्जेटिक आणि शक्तीशालीही असतात. पण त्यांना पेहलवानी करण्यासाठी एका खास शेपमध्ये रहावं लागतं. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, हे लोक खात काय असतील ना?
ऑनलाइन प्लॅटफॉर्म कोरावर काही लोकांनी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर अनेक उत्तरं मिळाली. सूमो पेहलवानांचं शरीर वेगळंच भारदस्त असतं. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक जास्त खाल्ल्यानंतर लठ्ठपणाचे शिकार होऊन सुस्त होतात. पण हे सूमो पेहलवान असं काय खातात, जे इतके लठ्ठ असूनही एनर्जेटिक राहतात. चला जाणून घेऊ यामागचं गुपित...
सामान्य व्यक्तीपेक्षा 8 ते 10 पटीने जास्त खातात सूमो
बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, एका सूमो पेहलवानाचं वजन सामान्य व्यक्तीपेक्षा 3 पट जास्त असतं. त्यांचं वजन दीड ते 2 क्वींटल असतं. दिवसातून ते 7 हजार- 8 हजार कॅलरीजचं सेवन करतात. तर एका सामान्य व्यक्तीला 2 हजार ते अडीच हजार कॅलरीजच लागतात. ते नाश्ता करत नाहीत आणि सकाळी रिकाम्या पोटी कसरत करतात. ते भाज्यांचा सूप पितात, ज्यात फिश, टोफू आणि मांस असतं. त्याशिवाय ते 5-6 कटोरे भात, सीफूड आणि सलाद खातात. खाल्ल्यानंतर ते 4 ते 5 पाच तास झोपतात. हीच झोप त्यांचं वजन वाढवते.
आजार होत नाही, पण आयुष्य कमी होतं
रिपोर्ट्स सांगतात की, रात्रीही ते खूप खातात आणि पुन्हा झोपतात. शिल्लक राहिलेल्या कॅलरी भरून काढण्यासाठी ते बिअर पितात. अशात त्यांना लठ्ठपणा वाढल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यासाठी त्यांना ऑक्सीजन मास्क लावून झोपावं लागतं. खास बाब ही आहे की, हे लोक लठ्ठ तर खूप असतात, पण यामुळे त्यांना आजार होत नाहीत. पण रिटायरमेंटनंतर जेव्हा त्यांचं डाएट कमी होतं तेव्हा त्यांना अनेक समस्या होतात. हेच कारण आहे की, सूमो पेहलवान रिटायर झाल्यावर 10 वर्ष कमी आयुष्य जगतात.