भारत आणि इंडोनेशियाचं नाव एकसारखं का वाटतं? जाणून घ्या याचा अर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 10:56 AM2023-10-27T10:56:21+5:302023-10-27T10:57:02+5:30

Knowledge : ऑनलाइन प्लॅटफॉर्म कोरावर यासंबंधी प्रश्न एका यूजरने विचारलं की, इंडोनेशिया या देशाचं नाव इंडिया या नावाची बरंच मिळतं जुळतं का आहे?

Do you know what is the meaning of Indonesia and how it connected with India | भारत आणि इंडोनेशियाचं नाव एकसारखं का वाटतं? जाणून घ्या याचा अर्थ...

भारत आणि इंडोनेशियाचं नाव एकसारखं का वाटतं? जाणून घ्या याचा अर्थ...

Knowledge : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा अर्थ जाणून घेण्यात तुम्हाला इंटरेस्ट राहत असेल. कधी ही एखादी गोष्ट असते तर कधी एखादी रोजची बाब असते. अनेकदा एकसारखे शब्द सुद्धा समोर येतात. ज्यांच्याबाबत उत्सुकता वाढते. पण नंतर समजतं की, दोन्ही शब्दांच्या अर्थाचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. आज अशाच दोन देशांबाबत सांगणार आहोत.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म कोरावर यासंबंधी प्रश्न एका यूजरने विचारलं की, इंडोनेशिया या देशाचं नाव इंडिया या नावाची बरंच मिळतं जुळतं का आहे? काय खरंच या दोन्ही देशांचां एकमेकांशी संबंध आहे? किंवा हा केवळ योगायोग आहे. यावर वेगवेगळ्या यूज़र्सने वेगवेगळी उत्तरे दिली. चला याबाबत जाणून घेऊ.

दोन देशांची नावं एकसारखी का वाटतात?

इंडोनेशिया आणि इंडियाचं नाव एकसारखं वाटतं. दोन्ही देश वेगवेगळे आहेत. पण यांचं उच्चारण एकसारखं वाटतं. वेगवेगळ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताचं नाव इंडिया हे इंडस रिव्हर म्हणजे सिंधू नदीच्या नावावर ठेवण्यात आलं. तेच इंडोनेशिया शब्द दोन ग्रीक शब्दांचं मिश्रण आहे. यात इंडोसचा अर्थ भारतीय किंवा हिंदी (हिंद महासागर नावातील आहे) असेल, तर नेसोसचा अर्थ द्वीप होतो. इंडोनेशियाचा अर्थ अनेक द्वीपांपासून बनलेला देश असा मानला जातो. असं सांगितलं जातं की, हे नाव या देशाला यूरोपियन प्रवाशांनी दिलं होतं. 

इंडोनेशियातही समृद्ध संस्कृती

भारतासारखीच इंडोनेशियामध्येही समृद्ध संस्कृती आहे. इथे हिंदू राजांच्या राज्य होतं. ज्यामुळे येथील संस्कृती आणि कलेवर भारताचा प्रभाव बघायला मिळतो. इथे आजही अनेक मंदिरे आढळतात. या देशाचा आपला एक वेगळा इतिहास आहे.

Web Title: Do you know what is the meaning of Indonesia and how it connected with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.