'परवा'ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसेल उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 17:37 IST2023-09-25T17:36:45+5:302023-09-25T17:37:14+5:30
सोशल मीडियाचा आधी केवळ मनोरंजनासाठी वापर केला जात होता. पण आजकाल अनेक महत्वाच्या गोष्टींसाठीही केला जातो.

'परवा'ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसेल उत्तर...
आयुष्यात अनेक प्रश्नं समोर येत असतात. ज्यातील काहींची उत्तरे मिळतात तर काहींची उत्तरे मिळत नाहीत. काही उत्तरे रोजच्या जगण्यात सापडतात तर काही पुस्तकांमध्ये. काही प्रश्न असे असतात ज्यांचं आयुष्यभर आपल्याला चुकीचं उत्तर माहीत असतं.
सोशल मीडियाचा आधी केवळ मनोरंजनासाठी वापर केला जात होता. पण आजकाल अनेक महत्वाच्या गोष्टींसाठीही केला जातो. अनेक महत्वाच्या गोष्टी यावर शेअर केल्या जातात. याद्वारे लोकांच्या माहितीत भर पडते. यावर प्रश्नांची उत्तरं शेअर केली जातात, पण त्यांना हे माहीत नसतं की, यातील अनेक उत्तर चुकीची असतात. अशाच एका शब्दाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
परवाचा इंग्रजी शब्द
आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना परवा या शब्दाचा अर्थ माहीत असेल. उद्याच्या नंतरचा दिवस म्हणजे परवा. इंग्रजीमध्ये उद्याला टुमारो म्हणतात. पण परवासाठी इंग्रजीमध्ये परफेक्ट शब्द कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे का? परवाला इंग्रजीमध्ये परफेक्ट शब्द ओवरमोरौ असा आहे. म्हणजे इंग्रजीत परवाला Overmorrow म्हणतात.