भारतातील असं ठिकाण जिथे अजिबात साजरी केली जात नाही दिवाळी, ना दिवा, ना फटाके फुटतात; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:16 IST2025-10-18T14:15:11+5:302025-10-18T14:16:05+5:30
Interesting Facts : परदेशातही दिवाळी (Diwali 2025) हा सण लोकप्रिय होत आहे. मात्र, भारतात काही ठिकाणी दिवाळी जवळजवळ साजरीच होत नाही.

भारतातील असं ठिकाण जिथे अजिबात साजरी केली जात नाही दिवाळी, ना दिवा, ना फटाके फुटतात; कारण...
Interesting Facts : भारतामध्ये दिवाळी (Diwali 2025) हा आनंद, प्रकाश आणि संपत्तीचा सण म्हणून साजरा केला जातो. बाजारपेठा सजल्या आहेत, घरांमध्ये स्वच्छता झाली आहे, आणि लक्ष्मीपूजनाची तयारी पूर्ण झाली आहे. परदेशातही हा सण लोकप्रिय होत आहे. मात्र, भारतात काही ठिकाणी दिवाळी जवळजवळ साजरीच होत नाही.
दिवाळी कुठे साजरी होत नाही?
केरळमध्ये दिवाळीच्या पारंपरिक उत्साहाची कमतरता आहे. लक्ष्मीपूजन नाही,फटाके नाहीत, आणि बहुतेक ठिकाणी दिवेही लावले जात नाहीत. कोच्ची हे एकमेव शहर आहे जिथे घरांसमोर दिवे लावलेले दिसतात.
यामागची कारणं काय?
महाबलीची पूजा: केरळमध्ये महाबली हा असुर पूजला जातो. दिवाळीचा उत्सव म्हणजे रावणावर रामाचा विजय साजरा करणे, जे येथे लोक सेलिब्रेट करत नाहीत.
हिंदू लोकसंख्या कमी: येथे हिंदू लोक कमी आहेत, त्यामुळे दिवाळीचा उत्साह कमी.
मानसूनाचा प्रभाव: दिवाळीच्या काळात जोरदार पाऊस येतो, ज्यामुळे फटाके आणि दिवे लावणे कठीण.
ओणमचा सण: दिवाळीच्या अगोदर येणारा ओणम हा राज्यातील सर्वात मोठा सण आहे. लोकांचा खर्च यावर जातो, त्यामुळे दिवाळीसाठी कमी उरतो.
तामिळनाडूमधील परिस्थिती
केरळसारखं तामिळनाडूमध्येही दिवाळी जास्त उत्साहात साजरी होत नाही. येथे नरक चतुर्दशीला अधिक महत्त्व दिले जाते.