शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Inspirational Story: तुमच्याही घरी नेटवर्क येत नाही का? वाशिमच्या पालकाचा जुगाड पहा, प्रॉब्लेमच सॉल्व्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 12:25 IST

Dishes for mobile range on every house in the village : प्रयाेग यशस्वी झाल्यानंतर आता गावातील प्रत्येक घरावर तबकड्या पाहायला मिळत आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गासाठी पालकांचा अफलातून शोध मिनी टॉवर पिंप्री अवगण गावात घरोघरी पाहायला मिळतात.

- नंदकिशाेर नारे

वाशिम: गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात ते उगीच नाही. असंख्य मानवी गरजांतूनच आजतागायत विविध शोध जगासमोर आले आहेत. ग्रामीण भागातही टॅलेंटची काही कमी नाही, हे पिंप्री अवगण येथील पालकाच्या देशी जुगाडाने दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गासाठी माेबाइलला नेट कनेक्टिव्हिटीचा खाेडा येत असल्याने अफलातून शाेध लावला. प्रयाेग यशस्वी झाल्यानंतर आता गावातील प्रत्येक घरावर तबकड्या पाहायला मिळत आहेत.

वाशिम जिल्ह्यात असलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण या गावातील नागरिकांनी घरात मोबाइलचे नेटवर्क मिळत नाही म्हणून घराच्या छतावर स्वनिर्मित मोबाइलचे टॉवरच उभारले आहे. स्टील प्लेट्स आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाइल नेटवर्कचे हे मिनी टॉवर आपल्याला पिंप्री अवगण या गावात घरोघरी पाहायला मिळतात. दरम्यान, कोरोना काळात ऑनलाईन वर्गासाठी घरात मोबाइलचे नेटवर्क मिळत नाही म्हणून मोबाइल नेटवर्कची रेंज वाढविण्यासाठी पिंप्री येथील संदीप अवगण यांनी या युक्तीचा शोध लावून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गाच्या प्रश्नांसोबतच गावकऱ्यांचा घराच्या छतावर, पत्र्यावर जाऊन फोनवर बोलण्याचा त्रास मिटविला आहे.

 

अशी मिळविली फ्रिक्वेन्सी

 

वायफाय तंत्रज्ञानाच्या कनेक्शनला काही प्लेट्स असतात, तसेच रेडिओ फ्रिक्वेन्सी व्यवस्थित करण्यासाठी पूर्वी त्याचा अँटिना थोडा उंच धरल्यास हवे ते स्टेशन सुरळीतपणे चालते, या पूर्वज्ञानातून संदीप अवगण या पालकाने दोन स्टीलच्या प्लेट्स विरुद्ध दिशेला लाकडी बांबूवर जोडल्या. त्याला टीव्ही डिशची तार जोडून तारेचे एक टोक घरात सेट केले. आसपासच्या मोबाइल टॉवरवरून सिग्नलशी जोडणाऱ्या वायू लहरींमधून पूर्वी मोबाइल सिग्नल नसणाऱ्या ठिकाणीही आता हायस्पीड नेटवर्क आल्याने पिंप्री अवगणवाशीयांच्या या देशी संशोधनाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.

 

 

गावात माेबाइलवर नेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने, तसेच भ्रमणध्वनीवर काॅल करण्यासाठीही रेंजचा प्राॅब्लेम असल्याने ही युक्ती शाेधली. हा प्रयाेग यशस्वी झाल्याने गावकऱ्यांनीही याचा वापर सुरू केला. ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांनाही याचा फायदा हाेत आहे.

 

- संदीप अवगण, ग्रामस्थ, पिंप्री अवगण

 

 

 

टॅग्स :washimवाशिमMobileमोबाइल