भारतात फक्त निळ्या रंगाचे नाही तर वेगळ्या रंगांचेही मिळतात पासपोर्ट, पाहा वेगळ्या रंगांचे अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:13 IST2025-09-05T14:12:46+5:302025-09-05T14:13:22+5:30
Indian Various Passport Meaning : अनेकांना हे माहीत नाही की, भारतात केवळ निळ्या रंगाचा नाही तर इतरही काही रंगाचा पासपोर्ट मिळतो.

भारतात फक्त निळ्या रंगाचे नाही तर वेगळ्या रंगांचेही मिळतात पासपोर्ट, पाहा वेगळ्या रंगांचे अर्थ
Indian Various Passport Meaning : परदेशात फिरायला जायचं असेल किंवा एखाद्या नोकरीसाठी जायचं असेल तर आपल्याला पासपोर्टची गरज पडते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. एखाद्या छोट्या डायरीसारखा हा पासपोर्ट सामान्यपणे निळ्या रंगाचा असतो. हा पासपोर्ट आपण भारताचे नागरीक असल्याचा पुरावा असतो. एअरपोर्टहून फ्लाइट पकडण्यापासून ते दुसऱ्या देशात उतरल्यावर इमिग्रेशन चेकपर्यंत पासपोर्टची गरज भासते. त्याशिवाय आपलं काहीच काम भागत नाही.
सामान्यपणे सगळ्यांना हेच माहीत आहे की, भारतीय पासपोर्ट हा निळ्या रंगाचा असतो. जास्तीत जास्त लोकांकडे याच रंगाचा पासपोर्ट असतो. पण अनेकांना हे माहीत नाही की, भारतात केवळ निळ्या रंगाचा नाही तर इतरही काही रंगाचा पासपोर्ट मिळतो. कधी हा पांढऱ्या रंगाचा तर कधी डार्क लाल रंगाचा असतो.
आता अनेकांना प्रश्न पडू शकतात की, एकाच देशात पासपोर्टचा रंग वेगवेगळे का असतात? याचा अर्थ काय असतो किंवा हे वेगळा पासपोर्ट का दिले जातात? अशात आज आपण हेच पाहणार आहोत की, भारतातील वेगवेगळ्या रंगांच्या पासपोर्टचा अर्थ काय असतो?
निळ्या रंगाचा पासपोर्ट
निळ्या रंगाच्या पासपोर्टला सामान्य किंवा ऑर्डिनरी पासपोर्ट म्हटलं जातं. भारतातील कोणतेही सामान्य नागरिक याच निळ्या रंगाच्या पासपोर्टचा वापर करतात. हा पासपोर्ट 36 ते 60 पानांचा असतो. ज्यावर E–Passport लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ यात एक इलेक्ट्रॉनिक चिप असते. ज्यात आपली बायोमेट्रिक माहिती सेफ असते. या पासपोर्टच्या माध्यमातून आपल्याला काही देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री मिळू शकते.
व्हाइट म्हणजेच पांढरा पासपोर्ट
पांढऱ्या रंगाच्या पासपोर्टला ऑफिशिअल पासपोर्ट म्हटलं जातं. हा सगळ्यांना मिळू शकत नाही. हा केवळ सरकारी अधिकारी आणि स्टाफला मिळू शकतो. जेव्हा हे लोक सरकारी कामासाठी परदेशात जातात तेव्हा त्यांना हा पासपोर्ट दिला जातो. याचा वापर ते त्यांच्या खाजगी प्रवासासाठी करू शकत नाहीत. कारण त्यावर स्पष्टपणे ऑफिशिअल पासपोर्ट असं लिहिलेलं असतं.
लाल पासपोर्ट
डार्क लाल रंगाच्या पासपोर्टला सगळ्यात खास मानलं जातं. या पासपोर्टला डिप्लोमॅटिक पासपोर्ट म्हटलं जातं. हा प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर, सेंट्रल मिनिस्टर, अॅम्बेसेडर सारख्या मोठ्या अधिकाऱ्यांना दिला जातो. या पासपोर्टनं त्यांना इंटरनॅशनल लेव्हलवर खास सूट आणि सुरक्षा मिळते. याद्वारे अनेक देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करता येतो.
नारंगी पासपोर्ट
नारंगी रंगाचा पासपोर्ट अशा लोकांना दिला जातो, ज्यांच्याकडे ECR म्हणजे इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड (Emigration Check Required) स्टेटस असतं. याचा अर्थ होतो की, हे लोक एकतर खूप शिकलेले नसतात किंवा काम करण्यासाठी काही देशांमध्ये जात असतात. हे पासपोर्ट असलेल्या लोकांना परदेशात जाण्याआधी खूप चौकशीतून जावं लागतं.