(Image Credit : thejakartapost.com)

पर्यावरण बदलामुळे आणि वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे कितीतरी समुद्री जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशात त्यांना वाचवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक पुढे येत आहेत. त्यांच्या याच प्रयत्नात त्यांना साथ देतो आहे १०० वर्षात कासव. हा कासव १९०६ मध्ये पहिल्यांदा आढळून आला होता. आज हा कासव त्याची प्रजाती लुप्त होऊ नये महत्वाची भूमिका बजावत आहे.

या Chelonoidis Hoodensis प्रजातीच्या कासवाचं नाव Diego आहे. हा कासव १९०६ मध्ये पहिल्यांदा कॅलिफोर्नियातील Santa Cruz Island वर आढळून आला होता. त्यावेळी या प्रजातीचे  केवळ दोन नर आणि दोन मादा कासव शिल्लक राहिले होते. Diego नंतर स्पेशल ब्रीडिंग प्रोग्रामचा भाग बनवण्यात आलं.

(Image Credit : apnews.com)

तेव्हापासून आतापर्यंत त्याने त्याच्या प्रजातीच्या ८०० कासवांना जन्म देण्यात मदत केली आहे. ५० वर्षांआधी सुरू झालेल्या या मोहिमेचं नाव Giant Tortoise Restoration Initiative (GTRI) होतं. या प्रोजेक्टबाबत Washington Tapia यांनी सांगितले की, गेल्या ५० वर्षात या कासवाच्या मदतीने आम्ही कासवांच्या २ हजारपेक्षा अधिक प्रजाती मिळवल्या आहेत.

त्यांच्यानुसार, या खास प्रजातीचे कासव वाढण्यासाठी इतके कासव पुरेसे आहेत. त्यामुळे आता या प्रोजेक्टमध्ये सहभागी कासवाला मोकळं सोडून देण्यात येणार आहे. त्यांनी असंही सांगितलं की, या प्रजातीचे कासव मासेमारी करणाऱ्या लोकांमुळे लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. १९०० च्या सुरूवातीच्या दशकात मच्छिमारी करणारे हे कासव पडकून आणायचे आणि भाजून खायचे. पण आता यावर बंदी घालण्यात आली आहे.

(Image Credit : globalnews.ca)

आता तर Chelonoidis Hoodensis चे कासव लुप्त होत असलेल्या यादीतून हटवण्यातही आले आहेत. ब्रीडिंग प्रोजेक्टमधून जन्माला आलेल्या सर्वच कासवांना आता Santa Cruz Island वर परत पाठवलं जात आहे. जेणेकरून तेथील जैव-विविधतेला पुन्हा नवं जीवन मिळेल.


Web Title: Diego a 100 year old tortoise has fathered 800 babies since 1960

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.