अंगठीतील हिरा लहान होता म्हणून होणाऱ्या पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल, पाहा प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 21:45 IST2022-05-11T21:40:50+5:302022-05-11T21:45:02+5:30
एका तरुणीने आपल्या साखरपुड्याची अंगठी लहान (Small Wedding Ring) असल्याने असं काही केलं, ज्याचा विचारही कोणी करणार नाही. तरुणीच्या पतीने ही घटना लोकांसोबत शेअर केली आहे.

अंगठीतील हिरा लहान होता म्हणून होणाऱ्या पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल, पाहा प्रकरण काय?
लग्नाबाबत (Marriage) प्रत्येक मुलीच्या मनात काही ना काही इच्छा किंवा स्वप्न नक्कीच असतात आणि ती पूर्ण झाली नाही तर तिला खूप वाईट वाटतं. मात्र एका तरुणीने आपल्या साखरपुड्याची अंगठी लहान (Small Wedding Ring) असल्याने असं काही केलं, ज्याचा विचारही कोणी करणार नाही. तरुणीच्या पतीने ही घटना लोकांसोबत शेअर केली आहे.
'द मिरर'च्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने सांगितलं की, त्याने त्याच्या पत्नीला साखरपुड्याला जी अंगठी घातली, ती घालायची नवरीला इतकी लाज वाटली की तिने ही अंगठी हातात घालण्यासच नकार दिला. एवढंच नाही तर तिने बोटाला अंगठीऐवजी रबर बँड बांधला.
TikTok यूजर अराशने त्याच्या फॉलोअर्ससोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या पत्नीचा हात दाखवला आणि सांगितलं की त्याने तीन कॅरेटची अंगठी साखरपुड्यासाठी खरेदी केली आहे, जी आता त्याच्या पत्नीच्या हातातून गायब आहे. याऐवजी तिने बोटाला एक लहान पांढरा रबर बँड बांधला आहे. त्याने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं की त्याने तिच्यासाठी विकत घेतलेल्या अंगठीतील हिरा खूपच लहान आहे, असं त्याच्या पत्नीला वाटतं.
हा व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल झाला आणि अराशच्या फॉलोअर्सनी यावर निरनिराळ्या कमेंट करायला सुरुवात केली. तेव्हापासून ही क्लिप १५ दशलक्षहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, तर काही लोक अराशला नवीन अंगठी घेण्याचा सल्लाही देताना दिसत आहेत.
फोटोला कॅप्शन देताना अरशने टिकटॉकवर लिहिलं की, माझ्या पत्नीला तिची छोटी हिऱ्याची अंगठी घालायला लाज वाटते, म्हणून तिने हा रबर बँड बोटात घातला आहे. दुसऱ्या एका क्लिपमध्ये त्याच्या पत्नीने सांगितलं की, माझी अंगठी खूपच लहान आहे, ती मोठी असती तर तिने नक्कीच घातली असती.
या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने थेट घटस्फोट घेण्याचाच सल्ला दिला. तो म्हणाला 'अंगठी बाजूला ठेवा आणि घटस्फोटाची कागदपत्रं तयार करा'. याशिवाय आणखी एकाने लिहिलं की, हे खूप वाईट आहे, मुली कधीच समाधानी राहू शकत नाहीत.