कंटेनरमध्ये लपून भारतीय ‘पाहुणा’ परदेशात पोहचला; ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:55 PM2021-10-21T15:55:19+5:302021-10-21T15:59:29+5:30

या पाहुण्याला घेऊन जाण्यासाठी ब्रिटीश पशू वैद्यकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

Deadly snake had travel in a shipping container from India to britain | कंटेनरमध्ये लपून भारतीय ‘पाहुणा’ परदेशात पोहचला; ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला

कंटेनरमध्ये लपून भारतीय ‘पाहुणा’ परदेशात पोहचला; ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला

Next

एका भयंकर विषारी पाहुणा अलीकडेच भारताहूनइंग्लंडपर्यंत लांबचा पल्ला गाठला आहे. विषारी पाहुणा सगळ्यांपासून लपून भारतातून एका शिपिंग कंटेनरमध्ये बसून थेट परदेशात पोहचला. या पाहुण्याला पकडण्यासाठी ब्रिटीश कर्मचाऱ्यांना खूप कसरत करावी लागली. त्याला सांभाळण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागली अन्यथा कुणाचाही जीव धोक्यात आला असता.  

या पाहुण्याला घेऊन जाण्यासाठी ब्रिटीश पशू वैद्यकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. हा पाहुणा दुसरा तिसरा कुणी नसून विषारी साप (Venomous Snake) आहे. इंग्लंडमधील साउथ एसेक्स वाइल्डलाइफ हॉस्पिटलनं फेसबुक पोस्ट करत या घटनेबद्दल माहिती दिली आहे. हॉस्पिटलच्या माहितीनुसार, भारतातून एका शिपिंग कंटेनरमध्ये लपून आलेला सापाला पकडण्यासाठी कॉल आला होता. एका मजुराला हा साप दिसला. हॉस्पिटलनं एक टीम सापाला पकडण्यासाठी पाठवली. टीमने सापाला पाहताच हा साप इंग्लंडमधील नसल्याचं आढळलं.

दररोज येणाऱ्या कॉलपैकी सापाचा एक कॉल होता. निश्चितपणे या सापाला जिथं असायला हवं त्या देशात हा नाही. जगातील विषारी सापांपैकी हा एक साप आहे. आरीच्या आकाराचा वाइपर रुपातील हा साप असल्याने किती धोकादायक आहे याची कल्पना ब्रिटीश अधिकाऱ्यांना आली होती. या पोस्टमध्ये सापांच्या प्रजातीबद्दल माहिती देण्यात आली. हा सर्वात घातक सापांपैकी एक असल्याचं सांगण्यात आलं. अन्य प्रजातीच्या तुलनेत लोकांना अधिक दंश करतो असं सांगितलं गेले.

या सापाला पकडून मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यात आलं आहे. सध्या हा साप सीलबंद खोलीत एका बॉक्समध्ये ठेवला आहे. सोशल मीडियावर लोकांनी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केले आहे. एका युजरने म्हटलंय की, टीमनं खूप चांगलं काम केले. किती मस्त हा प्राणी आहे. तर दुसऱ्याने सांगितले की, भलेही मी सर्पमित्र नाही. परंतु हा साप सुरक्षित असल्याने मी आनंदी आहे. इतका लांबचा प्रवास करूनही त्याला जीवन जगायला मिळत आहे. या सापाची देखभाल करणाऱ्या टीमचं अभिनंदन आहे.

Web Title: Deadly snake had travel in a shipping container from India to britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app