ज्या मुलावर तीन वर्षांआधी केले होते अंत्यसंस्कार, तो लॉकडाऊनमध्ये घरी परतला अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 15:28 IST2020-05-13T15:18:31+5:302020-05-13T15:28:27+5:30
छतरपूरच्या बिजावर परिसरात तीन वर्षांपूर्वी बिजावरच्या मौनासइया जंगलात एक मानवी सांगाडा सापडला होता.

ज्या मुलावर तीन वर्षांआधी केले होते अंत्यसंस्कार, तो लॉकडाऊनमध्ये घरी परतला अन्....
कोरोना व्हायरसमुळे अनेक लोक एकमेकांपासून दूर झाले तर अनेकजणांना महामारीत आपला जीव गमवावा लागला आहे. अशात मध्यप्रदेशातील एका कुटूंबासोबत एक आश्चर्यकारक घटना घडली आहे.
मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये कोरोना महामारी दरम्यान एका परिवारातील 'मरण पावलेला मुलगा' पुन्हा जिवंत परतला आहे. छतरपूरच्या बिजावर परिसरात तीन वर्षांपूर्वी बिजावरच्या मौनासइया जंगलात एक मानवी सांगाडा सापडला होता.
(All Image Credit : aajtak.intoday.in)
या सांगाड्याची ओळख भगोला आदिवासीने त्यांच्या मुलगा म्हणून पटवली होती. त्यानंतर कुटूंबियांनी जंगलात सापडलेल्या सांगाड्यावर अंत्यसंस्कारही केले होते. हे अंत्यसंस्कार एका मुलावर करतात तसेच केले गेले.
आता कोरोना संकटामुळे वेगवेगळ्या राज्यांमधून मजूर घर वापसी करत आहेत. अशात अचानक डिलारी गावातील एक तरूण उदय आदिवासी घरी परतला. तो घरी आल्याचे बघितल्यावर घरातील सर्वांनाच धक्का बसला. त्याला पाहून सगळेच अवाक् झाले. ज्या वडिलांनी आपल्या मुलाला मृत समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. तो मुलगा त्यांच्या समोर दारात जिवंत उभा होता.
या तरूणाला वडील पोलिसांकडे घेऊन गेले आणि त्यांना सगळी हकीगत सांगितली. सगळा प्रकार ऐकून पोलिसही हैराण झाले. तीन वर्षाआधी उदय नावाचा हा तरूण घरातील लोकांवर नाराज होऊन हरयाणातील गुरूग्रामला गेला आणि तिथे एका फॅक्टरीमधे काम करू लागला होता. लॉकडाऊन सुरू झालं म्हणून तो घरी परतला. आता पोलीस यासंबंधी फाइल पुन्हा ओपन करण्याच्या विचारात आहेत.