शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या प्रसिद्धीमुळे 'डान्सिंग अंकल' हैराण; उचललं 'हे' पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 17:17 IST

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे डान्सिंग अंकलचं आयुष्य बदललं

मुंबई: एका व्हिडीओमुळे रातोरात इंटरनेटवर हिट झालेल्या डान्सिंग अंकल अर्थात संजीव श्रीवास्तव यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं आहे. काही दिवसांपूर्वी प्राध्यापक म्हणून साधंसोपं आयुष्य जगणारे डान्सिंग अंकल सध्या प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना विविध टीव्ही शोजच्या ऑफर्स मिळत आहेत. मात्र अचानक मिळालेली ही लोकप्रियता सध्या संजीव यांच्यासाठी त्रासदायक ठरते आहे.एका कौटुंबिक कार्यक्रमात संजीव श्रीवास्तव यांची पावलं अशी काही थिरकली, की ते एका रात्रीत स्टार झाले. मात्र आता या लोकप्रियतेमुळे होणारा त्रास ओळखून संजीव यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. संजीव यांना गेल्या आठवड्याभरात 1 हजारहून अधिक फोन आले आहेत. या फोन कॉल्सला वैतागलेल्या संजीव यांनी त्यांचा मोबाईल भावाकडे सोपवला आहे. त्यामुळे आता संजीव यांचे भाऊच सर्व कॉल्स उचलतात. चाहत्यांचे फोन दिवसभर सुरू असल्यानं संजीव यांनी हा निर्णय घेतला. मात्र चाहत्यांशी संवाद कायम राहावा, म्हणून डान्सिंग अंकल ट्विटरवर सक्रीय झाले आहेत. सध्या डान्सिंग अंकलला बॉलीवूडच्या ऑफर्सही मिळू लागल्या आहेत. याकडे नीट लक्ष देण्यासाठी सतत खणाणणारा फोन त्यांनी भावाकडे सोपवला आहे. 'आपके आने से' गाण्यावरील नृत्यानंतर संजीव श्रीवास्तव यांनी अनेक वाहिन्यांना मुलाखत दिली. त्या एका व्हिडीओमुळे संजीव यांना मोठी लोकप्रियता मिळाली. लोक त्यांच्या भेटीसाठी तासनतास घराबाहेर उभे असतात. डान्सिंग अंकल लवकरच बॉलीवूडमध्येही दिसण्याची शक्यता आहे. चांगल्या चित्रपटाची ऑफर आल्यास ती स्वीकारणार असल्याचं श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.  

टॅग्स :danceनृत्यInternetइंटरनेटbollywoodबॉलिवूडSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया