शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

VIDEO : मेट्रो बुक करून मध्यरात्री सहा जणांची जल्लोषात 'पार्टी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:09 IST

Crazy XYZ : या व्हिडिओमध्ये अमित नावाचा मुलगा सांगतो की, त्याने जयपूर मेट्रोची संपूर्ण ट्रेन बुक केली.

एका मुलाने संपूर्ण मेट्रो ट्रेन बुक केली आणि प्रवासादरम्यान त्याने ट्रेनमध्ये आपल्या सहा मित्रांसोबत खूप मौज-मस्ती केली. तसेच, या सर्वांनी मिळून ट्रेनमध्ये आपापसात अनेक खेळ खेळले. दरम्यान, त्यांचा ट्रेनमधील व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 'Crazy XYZ' नावाच्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. 

या व्हिडिओमध्ये अमित नावाचा मुलगा सांगतो की, त्याने जयपूर मेट्रोची संपूर्ण ट्रेन बुक केली. व्हिडीओमध्ये आधी तो इंटीरियर क्लीनिंग शेडमध्ये प्रवास करण्यापूर्वी ट्रेन साफ ​​करताना दिसत आहे. त्यानंतर मेट्रो केबिनचे आतील दृश्यही दाखवले, ज्यामध्ये अनेक वेगवेगळी बटणे दिसत आहेत. यानंतर अमितने ड्रायव्हरला ट्रेन पुढे-मागे करुन दाखवायला सांगितली. रात्री 10 वाजता ट्रेन रिकाम्या प्लॅटफॉर्मवर आली. अमित आपल्या मित्रांसोबत ट्रेनमध्ये चढला. यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला.

व्हिडिओमध्ये अमितने संपूर्ण ट्रेनमध्ये फिरून रिकामी ट्रेन दाखवली आहे. ट्रेन सुरू झाल्यानंतर पहिले स्टेशन मानसरोवर येते. पण ट्रेन न थांबता पुढे जाते. यानंतर ट्रेनमध्ये मस्ती सुरू होते. अमित मित्रांसोबत खाली बसला आणि ते सर्वजण एक खेळ खेळू लागतात. या प्रवासादरम्यान मध्येच ट्रेन अशा ठिकाणी थांबते, जिथे सर्वजण शौचालयासाठी खाली उतरतात. 

ट्रेनमध्ये परत चढताना त्यांना बंद डब्यात जेवणही दिले जाते आणि ते ट्रेनमध्ये बसून जेवताना दिसतात. काही जण जेवल्यानंतर विश्रांती घेतात. तर बराच वेळ सर्व मित्र खेळण्यांच्या बंदुकांनी खेळतात. मग ते नाचतात आणि एकमेकांवर बनावट नोटा उडवताना दिसतात. यानंतर लेझी रीडरचा सुद्धा खेळ खेळला जातो. ही मजा रात्री एक वाजेपर्यंत चालते. त्यानंतर व्हिडिओ संपवत अमित म्हणाला की, आता फक्त एक छोटासा प्रवास बाकी आहे. 

दरम्यान, या व्हिडिओवर लोकांच्या मजेशीर कमेंट्स येत आहेत. एका यूजरने म्हटले आहे की,  xyz ही ट्रेन आमच्या वडिलांची आहे असे वाटले पाहिजे. दुसर्‍या यूजरने लिहिले - क्रेझी आयडिया भाऊ. तर तिसऱ्या यूजरने लिहिले - ड्रोनच्या मदतीने तुम्ही आकाशातून पैशांचा पाऊस पाडू शकता.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके