नव्या घराची गायीने अशी केली अवस्था, रडून रडून बेजार झाला घरमालक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 14:35 IST2019-06-07T14:32:16+5:302019-06-07T14:35:13+5:30

नव्या घराबाबत व्यक्तीची वेगवेगळी स्वप्ने असतात. नवं घर म्हटलं की, फारच जपलं जातं. निटनेटकेपणाचा अट्टाहासही केला अनेकजणांचा असतो.

Cows spend month roaming in newly built house and riddle it with poo | नव्या घराची गायीने अशी केली अवस्था, रडून रडून बेजार झाला घरमालक!

नव्या घराची गायीने अशी केली अवस्था, रडून रडून बेजार झाला घरमालक!

नव्या घराबाबत व्यक्तीची वेगवेगळी स्वप्ने असतात. नवं घर म्हटलं की, फारच जपलं जातं. निटनेटकेपणाचा अट्टाहासही केला अनेकजणांचा असतो. हा फोटो आहे मोंटाना येथील. अमेरिकेतील एका रेडिट यूजरने शेअर केला. त्याने पोस्ट लिहिली की, तो त्याच्या परिवारासोबत त्याच्या नव्या घरात शिफ्ट होणार होता. त्याआधी त्याने घरी जाऊन पाहिलं तर आत एक गाय होती. एक रूम पूर्णपणे गायीच्या शेणाने भरलेली होती.

दरवाजा उघडला आणि....

रेडिटवरून या व्यक्तीने त्यांचं अकाऊंट डिलीट केलं. पण Metro च्या वृत्तानुसार, या व्यक्तीने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा संपूर्ण घरात सगळीकडे शेणच शेण होतं. जमीन तर दिसतंच नव्हती. असे सांगितले जात आहे की, ही व्यक्ती आणि त्याचा परिवार वॉशिंग्टनमध्ये राहतो. तेथून लोक मोंटाना इथे शिफ्ट होणार होते.

रडू लागला मालक

या घराच्या देखभालीची जबाबदारी मालकाने त्याच्या मावशीला दिली होती. मावशी जाऊन तो जोरजोरात रडू लागला. पण गाय घरात घुसली कशी हे अजूनही त्याला कळालं नाही. गायीच्या मालकाला देखील याबाबत काहीच माहीत नव्हतं. असं सांगितलं जात आहे की, जवळपास १ महिन्यांपासून गाय या घरात बंद होती. आजूबाजूला घरात गवतही होतं. 

Web Title: Cows spend month roaming in newly built house and riddle it with poo