गेस्टसमोर नेकेड होऊ पार्टी करणार आहे हे पती-पत्नी, लोकांनी केला विरोध...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:33 IST2022-12-23T15:32:13+5:302022-12-23T15:33:10+5:30
London : इतकंच नाही तर आपल्या 15 वर्षांच्या मुलीसमोरही त्यांनी नेकेड राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ला पर्यावरणवादी म्हणणारं हे कपल सध्या पार्टीच्या तयारीत बिझी आहे.

गेस्टसमोर नेकेड होऊ पार्टी करणार आहे हे पती-पत्नी, लोकांनी केला विरोध...
एका कपलचं म्हणणं आहे की, ते न्यूड होऊन ख्रिसमस पार्टी करतील. यावरून सोशल मीडियावरील लोक त्यांच्यावर भडकले आहेत. मुळात पती-पत्नीने सांगितलं होतं की, ख्रिसमस पार्टीमध्ये घरी आलेल्या गेस्टसमोर ते नेकेड राहतील. इतकंच नाही तर आपल्या 15 वर्षांच्या मुलीसमोरही त्यांनी नेकेड राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ला पर्यावरणवादी म्हणणारं हे कपल सध्या पार्टीच्या तयारीत बिझी आहे.
कपल ब्रिटनच्या केंटमध्ये राहणारं आहे. त्यांच नाव हेलेन आणि सायमन आहे. त्यांना 15 वर्षांची एक मुलगी आहे. ते विना कपडे राहण्याच्या प्रथेच पालन करत आहेत. नुकताच कपलने ख्रिसमसबाबत त्यांचा प्लान सार्वजनिक केला. पण सोशल मीडियावरील लोकांचं मत आहे की, कपल हे योग्य करत नाहीयेत. त्यांनी पाहुण्यांसमोर विना कपडे राहू नये.
हेलेन म्हणाली की, ख्रिसमसला ती आणि तिचा पती सायमन नेकेड स्थितीत राहतील. तर घरातील इतर पाहुणे कपडे घालून राहतील. यात त्यांची मुलगी आणि सासूचाही समावेश असेल. केवळ हेलेन आणि सायमन दोघेही कपड्यांविना राहतील.
याबाबत द सनसोबत बोलताना हेलेनने सांगितलं की, आम्ही गिफ्ट्सची देवाण-घेवाण करू, पार्टी करू, जशी ख्रिसमसला नेहमीच करतो. फक्त फरक इतका असेल की, सायमन आणि माझ्या शरीरावर टोपीशिवाय काहीच कपडे नसतील.
हेलेन म्हणाली की, आम्ही वर्षभरापासून नेकेड ख्रिसमस पार्टीची वाट बघत आहोत. काही लोक आमच्याकडे असे बघतात की, आम्ही वेडे आहोत. पण फक्त तुम्हाला आम्हाला स्वीकार करण्याची गरज आहे. बाकी सगळं सहजपणे होईल.