ऐकावं ते नवलंच!; बाळाच्या नामकरणासाठी चक्क मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 11:45 AM2018-06-19T11:45:41+5:302018-06-19T11:45:41+5:30

मतपत्रिकेच्या आधारे 192 जणांनी केलं मतदान

couple organize voting to decide baby name | ऐकावं ते नवलंच!; बाळाच्या नामकरणासाठी चक्क मतदान

ऐकावं ते नवलंच!; बाळाच्या नामकरणासाठी चक्क मतदान

googlenewsNext

गोंदिया: लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान केलं जातं, हे तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही मतदान करुन लोकप्रतिनिधीदेखील निवडला असेल. मात्र गोंदियातील एका दाम्पत्यानं त्यांच्या मुलाच्या नामकरणासाठी मतदानाचा आधार घेतला आहे. नवजात बाळाच्या नामकरणासाठी कुटुंब, नातेवाईक आणि मित्र परिवारानं मतदान केलं. 

गोंदियातील मिथुन आणि मानसी बंग यांना 5 एप्रिल रोजी मुलगा झाला. या मुलासाठी नातेवाईकांनी तीन नावं सुचवली होती. त्यामुळे मग बंग दाम्पत्यानं त्याच्या नामकरणासाठी मतदानाचा आधार घेतला. यासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात आला. यावर यक्ष, युवान आणि यौविक असे तीन पर्याय होते. बाळाच्या नामकरणासाठी एकूण 192 जणांनी मतदान केलं. यातील 92 जणांनी युवान या नावाचा पसंती दिली. हे मतदान पार पडल्यानंतर बाळाचं नामकरण करण्यात आलं. 

बाळाच्या नामकरणाला गोंदियाचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते नाना पेटोलेदेखील उपस्थित होते. पटोलेंनी 2014 मध्ये भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे भंडारा-गोंदियामध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक झाली. 
 

Web Title: couple organize voting to decide baby name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.