Couple gets married at uttar pradesh uttarakhand border due to lockdown myb | लॉकडाऊनमध्ये झाली 'लगीनघाई'; अन् मग बॉर्डरवरच उडवला लग्नाचा बार

लॉकडाऊनमध्ये झाली 'लगीनघाई'; अन् मग बॉर्डरवरच उडवला लग्नाचा बार

(image credit- Times of india)

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणून लोकांना आणि संपूर्ण देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे अनेकांची ठरलेली लग्न पूढे ढकलण्यात आली आहेत. काहींनी नियमांचे पालन करत तर काहींनी एकापेक्षा एक जुगाड करत लॉकडाऊनमध्येही  आपलं लग्न केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत.

कोरोनाच्या संकटामुळे भारतातील अनेक राज्यांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे एका कपल्सनी  चक्क बॉर्डरवरच लग्न केलं आहे.  जेव्हा या दोघांना एकमेकांच्या राज्यात जाऊ दिले नाही. तेव्हा त्यांनी बॉर्डरवरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवरी आपल्या जोडीदारासोबत त्याच्या राज्यात गेली आहे. 
उत्तरप्रदेश, उत्तराखंड बॉर्डरवर हे लग्न झालं आहे.

उत्तराखंडच्या टीगरी कोटी कॉलनीमधील अरविंद यांच लग्न उत्तरप्रदेशातील बिजनैरमधील छाया नावाच्या मुलीसह  बुधवारी ठरवण्यात आलं होतं. मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी लग्न ठरलं असून मुलाकडच्या मंडळींना लॉकडाऊनमुळे राज्यात येता आलं नाही. 

दोघांच्याही घरातील  मंडळींना याच दिवशी लग्न लावून द्यायचं होतं. म्हणून त्यांनी प्रशानसाला विनंती करून बॉर्डरवरच लग्न केलं. यावेळी दोन्ही राज्यांचे पोलीस सुद्धा उपस्थित होते. नुकतंच लग्न झालेल्या अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बॉर्डरवर लग्नाची परवागनी दिल्यामुळे तीन नातेवाईकांच्या उपस्थित हे लग्न पार पडलं.

नादच खुळा! लॉकडाऊनमध्ये रातोरात बनला करोडपती; अन् आता करणार 'हे' काम

बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट

Web Title: Couple gets married at uttar pradesh uttarakhand border due to lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.