VIDEO : चालत्या ट्रेनमध्ये कपलने केलं लग्न, बघतच राहिले इतर प्रवासी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 10:20 IST2023-12-01T10:19:57+5:302023-12-01T10:20:29+5:30

Viral Video : हे सगळं करून झाल्यावर भावूक झालेली नवरी नवरदेवाला मिठी मारते. इतर प्रवासी त्यांना प्रोत्साहन देत आहेत.

Couple gets married inside crowded moving train video viral | VIDEO : चालत्या ट्रेनमध्ये कपलने केलं लग्न, बघतच राहिले इतर प्रवासी...

VIDEO : चालत्या ट्रेनमध्ये कपलने केलं लग्न, बघतच राहिले इतर प्रवासी...

Viral Video : चालत्या ट्रेनमध्ये एका कपलच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक कपल ट्रेनमध्ये एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, तरूणीच्या भांगेत कुंकू भरलेलं आहे आणि तरूण नंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. नंतर दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. त्यानंतर तरूणी तरूणाच्या पायाही पडते. तर ट्रेनमधील इतर प्रवासी दोघांचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत.

हे सगळं करून झाल्यावर भावूक झालेली नवरी नवरदेवाला मिठी मारते. इतर प्रवासी त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करत आहेत. ही घटना कुठे घडली आणि या अशा लग्नामागचं कारण काय हे समजू शकलेलं नाही. पण या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत. तर अनेकांनी हे जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली की, या कपलने असं ट्रेनमध्ये लग्न का केलं. तर अनेकांनी वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स केल्या. तर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली.

एका यूजरने कमेंट केली की, 'बहुउद्देशीय भारतीय रेल्वे'. दुसऱ्याने कमेंट केली की, 'बजेट कमी असेल, नाही तर प्लेनमध्ये केलं असतं'. एकाने लिहिलं की, हे लग्न नाही तर फक्त नौटंकी आहे. 

Web Title: Couple gets married inside crowded moving train video viral