अजबच! अनेक वर्षांपासून कपलनं घेतली नाही पाण्याची टेस्ट, पितात फक्त स्वत:ची लघवी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:44 IST2025-02-20T15:43:37+5:302025-02-20T15:44:11+5:30
खरंतर यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. सध्या सोशल मीडियावर या कपलची चर्चा रंगली आहे.

अजबच! अनेक वर्षांपासून कपलनं घेतली नाही पाण्याची टेस्ट, पितात फक्त स्वत:ची लघवी!
एक्सपर्ट नेहमीच दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण पाणी प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी तत्व लघवीद्वारे आणि घामाच्या माध्यमातून बाहेर पडतात. मात्र, तुम्हाला वाचून धक्का बसेल की, एका कपलला स्वत:चीच लघवी पिण्याची सवय लागली आहे. खरंतर यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. सध्या सोशल मीडियावर या कपलची चर्चा रंगली आहे.
या कपलनं दावा केला आहे की, त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीच प्यायलं नाही. जेव्हाही त्यांना तहान लागते तेव्हा ते थेट बाथरूममध्ये जातात आणि बॉटलमध्ये लघवी भरतात. त्यानंतर ती पिऊन आपली तहान भागवतात. लोकांचा यावर विश्वास बसला नाही. तेव्हा या कपलनं चक्क पुरावाच दाखवला.
ओब्री आणि निक नावाच्या या कपलला स्वत:ची लघवी पिण्याची सवय आहे. दोघेही ग्लासमध्ये लघवी भरून चिअर्स करताना दिसतात. ते प्रत्येकवेळी हाफ गॅलन इतकी लघवी पितात. दोघेही एखादं कोल्ड ड्रिंक प्यावं तशी लघवी पितात. लघवीचा एक थेंबही दोघे वाया घालवत नाहीत. इतकंच नाही तर दोघे लघवीनं आंघोळ करतात. फेस मास्कसारखाही वापर करतात आणि डोळ्यात ड्रॉप म्हणूनही वापरतात.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तरूणीनं सांगितलं की, दोघेही आरामात लघवी पितात. इतकंच नाही तर तरूणीनं याची टेस्ट कशी लागते हेही सांगितलं. तिनं सांगितलं की, याची टेस्ट बटर पॉपकॉर्नसारखी लागते. त्यामुळे ते पिण्यात त्यांना काहीच अडचण नाही.