'या' देशातील करन्सीला नाही अजिबात किंमत, भाजीच्या भावात बाजारात विकल्या जातात नोटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:26 IST2025-01-30T15:26:05+5:302025-01-30T15:26:25+5:30

सोमालीलॅंड असं या देशाचं नाव असून येथील अधिकृत करन्सी सोमालीलॅंड शिलिंग आहे. या देशाची माहिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Country where money is worthless people buy it at junk prices | 'या' देशातील करन्सीला नाही अजिबात किंमत, भाजीच्या भावात बाजारात विकल्या जातात नोटा!

'या' देशातील करन्सीला नाही अजिबात किंमत, भाजीच्या भावात बाजारात विकल्या जातात नोटा!

जगातील वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी करन्सी आहे. भारतात रूपयाचं चलन आहे तर अमेरिकेत डॉलर. यूकेमध्ये पाउंड तर थायलॅंडमध्ये बाथ. प्रत्येक देशाची करन्सी त्यांच्यासाठी महत्वाची असते. कारण याद्वारे सगळे व्यवहार केले जातात. एका देशातून जेव्हा कुणी दुसऱ्या देशात जातात तेव्हा करन्सी चेंज करून तेथील करन्सी घ्यावी लागते. म्हणजे तेथील करन्सीच्या माध्यमातूनच तुम्ही तिथे खरेदी करू शकता. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात असाही एक देश आहे जिथे पैशांचं दुकान लागतं. म्हणजे या देशात त्यांच्या करन्सीच्या नोटा रस्त्यावर विकत मिळतात. 

सोमालीलॅंड असं या देशाचं नाव असून येथील अधिकृत करन्सी सोमालीलॅंड शिलिंग आहे. या देशाची माहिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत सांगण्यात आलं की, जगात एक असा देश आहे जेथील करन्सीला अजिबात व्हॅल्यू नाही. येथील करन्सी तराजूने मोजून विकली जाते. सोमालीलॅंड देश स्वत:ला स्वतंत्र मानतो. पण जग या देशाला देश मानायला तयार नाही. आफ्रिकेच्या पूर्वेत स्थित सोमालीलॅंड एक छोटा भाग आहे. १९९१ मध्ये जव्हा सोमालीलॅंडमध्ये गृहयुद्ध सुरू होतं, तेव्हा सोमालीलॅंडनं स्वत:ला वेगळा देश घोषित केलं होतं. या देशाचं क्षेत्रफळ साधारण १ लाख ३७ स्क्वेअर मीटरपर्यंत पसरलं आहे. तर येथील लोकसंख्या ४० लाख आहे.

या स्वयंघोषित देशातील सगळ्यात अजब बाब म्हणजे येथील करन्सी लोक भाजीच्या भावात विकत घेतात. पूर्ण सोमालियाची करन्सी सोमाली शिलिंग आहे. इथे १ डॉलर जवळपास ५७० सोमाली शिलिंगच्या बरोबरीत आहे. तर सोमालीलॅंडमध्ये १ अमेरिकन डॉलरची किंमत १० ते ११ हजार सोमालीलॅंड शिलिंग बरोबरीत असते. त्यामुळे येथील दुकानदार पैसे मोजण्याऐवजी वजन करण्यावर विश्वास ठेवतात. अशात जर तुम्ही सोमालीलॅंडला गेले तर भारतीय शंभर रूपयाच्या बदल्यात तुम्ही जवळपास १२ हजार सोमालीलॅंड शिलिंग मिळतील. 

सोमालीलॅंडनं भलेही स्वत:ला देश घोषित केलं असलं तरी जगाच्या नजरेत हा देश अजूनही सोमालियाचा भाग आहे. जास्तीत जास्त देशांनी सोमालीलॅंडला मान्यता दिलेली नाही. सोमालियासारखी इथेही उपासमार आणि बेरोजगारी आहे. 

सोशल मीडियावर सोमालीलॅंडचं सत्य सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३ कोटी १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखो लोकांनी हा व्हिडीओ लाइक आणि शेअर केला आहे. तर हजारो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. 

Web Title: Country where money is worthless people buy it at junk prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.