Corona virus : कोरोनासारखाच जीवघेणा होता 'हा' रोग, भारतातच लस शोधून वाचवला लाखों लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 05:18 PM2020-04-03T17:18:29+5:302020-04-03T17:36:10+5:30

वेगवेगळ्या देशाचे रिसर्चकर्त्ये आणि डॉक्टरर्स या आजारावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

Corona virus: Remembering the plague vaccine during the corona crisis know about waldemar haffkine myb | Corona virus : कोरोनासारखाच जीवघेणा होता 'हा' रोग, भारतातच लस शोधून वाचवला लाखों लोकांचा जीव

Corona virus : कोरोनासारखाच जीवघेणा होता 'हा' रोग, भारतातच लस शोधून वाचवला लाखों लोकांचा जीव

Next

चीनच्या वुहान शहरातून संपूर्ण जगभरात कोरोना पसरला. या व्हायरसच्या संक्रमणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आत्तापर्यंत कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही औषधाचा शोध लागलेला नाही. वेगवेगळ्या देशाचे रिसर्चकर्त्ये आणि डॉक्टरर्स या आजारावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे जगाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जगभरात  ८ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ४४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर प्लेग या रोगाला नष्ट करणारे हाफ्फिन यांची आठवण काढत आहेत. रुसचे रहिवासी  असलेल्या हाफ्किन यांनी भारतात २२ वर्ष काढली होती. 

भारतात २२ वर्ष काढणारे हाफ्किन यांनी मुंबईतील जेजे हॉस्पिटमध्ये प्लेगच्या लसीचा शोध लावला. या लसीच्या शोधामुळे लाखो लोकांचा जीव वाचला. यांना कॉलरा या रोगाची लस तयार करण्याचं सुद्धा श्रेय दिलं जातं. आता त्या जे. जे हॉस्पीटलमधिल खोलीचा वापर एमबीबीएस मुलांच्या लेक्चरसाठी केला जातो. जे.जे हॉस्पिटलचे  मेडिकल अधिकारी डॉक्टर रेवत कानिन्दे यांना या इमारतीला पाहून हाफ्किन यांच्या शोधाची जाणिव होते.  परंतू आत्तापर्यंत कोरोना व्हायरसची लस शोधण्यात आली नाही. याचं त्यांना दुखं आहे.

डॉ. कानिन्दे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की रुसवरून आलेल्या एका वैज्ञानिकाच्या विचाराने खूप ऐतिहासीक कार्य घडवून आणणं होतं. सरकारकडून मेडिकल कॉलेज आणि जेजे हॉस्पिटच्या इमारतींच्या भीतींवर हाफ्किनच्या सन्मानार्थ बोर्ड लावण्यात आला आहे. ज्याचं उद्घाटन १९७१ मध्ये करण्यात आलं होतं. मुर्ती आणि स्मारकांवर खर्च करण्यापेक्षा संशोधनावर अधिक खर्च करायला हवा. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Web Title: Corona virus: Remembering the plague vaccine during the corona crisis know about waldemar haffkine myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.