CoronaVirus : खरं सांगताय की मस्करी? लॉकडाऊनमध्ये कुत्रे दारू पोहोवतायत घरोघरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:42 IST2020-04-21T13:25:21+5:302020-04-21T13:42:43+5:30
क्वारंटाईन असलेल्या लोकांपर्यंत वाईन पोहोचवण्यााठी या आगळ्या वेगळ्या पध्दतीचा वापर केला जात आहे.

CoronaVirus : खरं सांगताय की मस्करी? लॉकडाऊनमध्ये कुत्रे दारू पोहोवतायत घरोघरी...
कोरोना व्हायरसच्या महामारीने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. चीननंतर अमेरिका, भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहेत. अनेक देशात कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. शासनाने लोकांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले आहेत. सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्यात येत आहे.
दरम्यान अमेरिकेतील मॅरिलँड भागातील एका वाईनरी शॉपच्या मालकाने एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. क्वारंटाईन असलेल्या लोकांपर्यंत वाईन पोहोचवण्यााठी या आगळ्या वेगळ्या पध्दतीचा वापर केला जात आहे. सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून लोकांपर्यंत वाईन पोहोचवली जाणार आहे. वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. सोशल मीडीयावर हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
(image credit- India Today)
कुत्रे दारू पोहोचवण्याचं काम करत आहेत
क्वारंटाईनच्या दरम्यान दारूची होम डिलीव्हरी करत असलेल्या या कुत्र्याचं नाव सोडा आहे. अमेरिकेतील मॅरिलँडमधील स्टोन अर्बन वाईन्स या दुकान मालकाचा हा कुत्रा आहे. या कुत्र्याचे नाव सुद्धा वाईन शॉपच्या मालकानेच ठेवलं आहे. हा कुत्रा लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या घरी वाईन आणि सोड्याची डिलिव्हरी करत आहे. त्यांनी आपल्या कुत्र्यांचं कौतुक करत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
कुत्र्यामार्फत होम डिलिव्हरी करण्यासाठी वाईन विक्रेता आपल्या कुत्र्याच्या पाठीवर एक कापडाची बॅग लावून त्यात वाईनच्या बॉटल्स भरून लोकांच्या घरी पाठवत आहे. या बॅगमध्ये एकावेळी २ वाईनच्या बॉटल्स राहू शकतात. यामुळे ग्राहकांना वाईन विकत घेण्यासाठी कोणतीही अडचड येणार नाही. अशी पद्धत वापरल्यामुळे दुकान मालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.