विहिरीत पडला कोब्रा, जीवाची बाजी लावून युवकानं वाचवले प्राण; बाहेर पडताच...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:16 PM2022-03-29T20:16:09+5:302022-03-29T20:16:36+5:30

हा हैराण करणारा व्हिडीओ महाराष्ट्रात नाशिकमधला असल्याचं सांगितले जात आहे.

cobra rescue from an abandoned well in the Nasik area of Maharashtra | विहिरीत पडला कोब्रा, जीवाची बाजी लावून युवकानं वाचवले प्राण; बाहेर पडताच...

विहिरीत पडला कोब्रा, जीवाची बाजी लावून युवकानं वाचवले प्राण; बाहेर पडताच...

Next

सापाला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. काही जण सापाच्या नावानेच थरथर कापतात तर काही बेधडक सापाच्या समोर जातात. त्यात कोब्रा साप दिसला तर कितीही पकडणारा हिंमतीचा असला तरीही त्याच्याही मनात क्षणभर भीती निर्माण होते. कोब्रा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक मानला जातो. सध्या सोशल मीडियावर कोब्राचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती कोब्राच्या जवळ जात असल्याचं दिसून येते.

खतरनाक कोब्राला विहिरीतून वाचवतो

व्हायरल व्हिडीओ न्यूज एजन्सी एएनआयनं त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, कोब्रा साप एका खोल विहिरीत अडकला होता. हे पाहून व्यक्ती जीव धोक्यात घालून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, कशारितीने तो युवक सापाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. कोब्रासारखा अत्यंत विषारी सापाला वाचवण्यासाठी युवकाने स्वत:च्या प्राणाची बाजी लावली.

तुम्ही पाहू शकता की, हा युवक सहजपणे कोब्रा सापाला रेस्क्यू करत आहे. कोब्रा एका दोरीच्या आधारे विहिरीतून बाहेर येतो. त्यानंतर युवक त्याला एका कापडी पिशवीत भरतो. या सापाला विहिरीतून बाहेर काढताना कुठल्याही प्रकारे युवकाने सुरक्षित उपकरण हाती घेतले नव्हते. तो त्याच्या जीवाची पर्वा न करता कोब्रा सापाला विहिरीतून बाहेर काढत होता. याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी युवकाचा हा व्हिडीओ काढला. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा हैराण करणारा व्हिडीओ महाराष्ट्रात नाशिकमधला असल्याचं सांगितले जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार, कोब्रा सापाला विहिरीतून रेस्क्यू करण्याचं काम वन्यजीव संघटनेच्या एका स्वयंसेवकाने केले. हा युवक दोरीच्या सहाय्याने लोखंडी अवजाराचा वापर करून सापाला बाहेर काढत होता. तो साप सहजपणे त्या लोखंडी अवजाराला विळा मारतो. भलेही या व्यक्तीने माणुसकी दाखवत सापाला रेस्क्यू करतो. परंतु हा जीवघेणा प्रकार होता अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.  

Web Title: cobra rescue from an abandoned well in the Nasik area of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.