जगात पहिल्यांदा इथे उगवलं होतं लवंगाचं झाड, ३ हजार वर्ष जुना आहे इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 02:41 PM2019-02-23T14:41:30+5:302019-02-23T14:46:49+5:30

लवंगाचा वापर प्रत्येक घरात कशात ना कशात होतोच, मसाला म्हणून किंवा दातांचं दुखणं दूर करण्यासाठी लवंग खाल्ली जाते.

Clove tree was grown on the island of Ternate Indonesia for the first time in the world | जगात पहिल्यांदा इथे उगवलं होतं लवंगाचं झाड, ३ हजार वर्ष जुना आहे इतिहास

जगात पहिल्यांदा इथे उगवलं होतं लवंगाचं झाड, ३ हजार वर्ष जुना आहे इतिहास

googlenewsNext

लवंगचा वापर प्रत्येक घरात कशात ना कशात होतोच, मसाला म्हणून किंवा दातांचं दुखणं दूर करण्यासाठी लवंग खाल्ली जाते. भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्येही याचा वापर केला जातो. आज भलेही लवंग जगभरात माहिती असेल, पण तुम्हाला माहीत आहे का जगात लवंगाच झाड पहिल्यांदा कुठे उगवलं होतं? चला जाणून घेऊ याचा इतिहास....

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, आजपासून साधारण तीन हजार वर्षांआधी लवंगाचा झाड केवळ पूर्व एशियाच्या काही द्वीपांवरच असायचे. असे म्हटले जाते की, इंडोनेशियाच्या टर्नेट द्वीपवर जगातली सर्वात जुनं लवंगाचं झाड आहे. 

टर्नेट द्वीपवर जास्त भागात ज्वालामुखी आहे. पण तरी सुद्धा इथे मोठ्या संख्येत लोक फिरायला येतात. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ३-४ हजार वर्षांआधी टर्नेट, टिडोर आणि त्याच्या आजूबाजूच्या काही द्वीपांवर लवंगाची झाडे आढळत होते. लवंगचा व्यवसाय करून द्वीपावर राहणारे त्यावेळचे लोक फार श्रीमंत होते. 

असे म्हटले जाते की, टर्नेट आणि टिडोरच्या सुल्तानांकडे लवंगाचा व्यवसाय करून चांगलीच संपत्ती जमा झाली होती. ते स्वत:ला फार जास्त शक्तीशाली समजत होते आणि आपसातच भांडू लागले. याचा फायदा घेत इंग्रजांनी आणि डच व्यावसायिकांनी लवंग जिथे जास्त आहे त्या परिसरावर ताबा मिळवला. 

या द्वीपांवर अनेकप्रकारचे जीव-जंतू आढळतात. इथे उडणारे बेडूकही आढळतात. १९व्या शतकात इंग्रज वैज्ञानिक अल्फ्रेड रसेल वॉलेसने वेगवेगळ्या शोधासाठी अनेक वर्ष घालवली. १९६२ मध्ये जेव्हा ते लंडनला परत आले तेव्हा ते सोबत सव्वा लाखांपेक्षा जास्त प्रजातींचे नमूने घेऊन आले होते. आज त्यांच्यामुळेच जनावरांच्या वेगवेगळ्या प्रजातींबाबत माहिती मिळाली आहे. 

Web Title: Clove tree was grown on the island of Ternate Indonesia for the first time in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.