नासलेल्या दुधापासून पनीर नाही तर बनवले जात आहेत कपडे, पाहा किती असते किंमत आणि कसे बनवतात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:15 IST2025-11-18T16:09:03+5:302025-11-18T16:15:42+5:30
Milk Fabric : जे दूध फाटल्यावर म्हणजेच नासल्यावर आपण फेकून देतो किंवा ज्यापासून पनीर बनवतो, त्याच दुधापासून आज डिझायनर सूट आणि साड्या तयार केल्या जात आहेत.

नासलेल्या दुधापासून पनीर नाही तर बनवले जात आहेत कपडे, पाहा किती असते किंमत आणि कसे बनवतात!
Milk Fabric : उलन आणि सूती कापड विसरा… आता दुधापासूनही कपडे तयार होत आहेत! होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आपण कधी विचारही केला नसेल की, जे दूध फाटल्यावर म्हणजेच नासल्यावर आपण फेकून देतो किंवा ज्यापासून पनीर बनवतो, त्याच दुधापासून आज डिझायनर सूट आणि साड्या तयार केल्या जात आहेत. या कापडाला मिल्क फॅब्रिक असं म्हणतात. आता हे कसं तयार होतं, कितीला मिळतं हेच आज आपण पाहणार आहोत.
एक लिटर दूध = फक्त 10 ग्रॅम फॅब्रिक!
मिल्क फॅब्रिक तयार करणं खूपच मेहनतीचं काम आहे. कारण 1 लिटर दुधापासून फक्त 10 ग्रॅम कापड तयार होतं. एक टी-शर्ट तयार करण्यासाठी 60–70 लिटर दूध लागतं. म्हणूनच याची किंमतही खूप जास्त असते. 1 मीटर मिल्क फॅब्रिक हे ₹15,000 ते ₹45,000 रूपये किंमतीचं असतं. तर एक साडी ₹3 ते ₹5 लाख किंमतीची असते.
हा कापड तयार कसा करतात?
याची प्रक्रिया ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आधी दुधाला आधी फाडलं म्हणजेच नासवलं जातं. त्यातून केसीन प्रोटीन वेगळं केलं जातं. हे प्रोटीन पाण्यात मिसळून लिक्विड बनवलं जातं. स्पिनिंग मशीनमध्ये टाकून ते रेशांमध्ये बदलतात. हे रेशे रेशमासारखे मुलायम आणि चमकदार असतात. त्यापासून मग कापड विणलं जातं. यात कोणतेही केमिकल वापरले जात नाहीत, म्हणूनच हे कापड 100% नैसर्गिक, बायोडिग्रेडेबल आणि स्किन-फ्रेंडली आहे.
इतिहास जुना आहे…
दूधापासून कापड बनवण्याची कल्पना नवी नाही. 1930 च्या दशकात इटलीमध्ये दुसऱ्या महायुद्धात उलन कमी पडल्यावर तिथे दूधातून कापड तयार करण्यात आलं. त्याला Lanital असं नाव होतं. युद्ध संपल्यानंतर उलन आणि सिंथेटिक कापड स्वस्त झाले आणि ही टेक्नोलॉजी गायब झाली. पण आता पुन्हा 2025 मध्ये मिल्क फॅब्रिकचं धमाकेदार पुनरागमन झालं आहे.
आज लोकांना हे कापड का आवडतंय?
आज सस्टेनेबल फॅशनचा जमाना आहे. प्लास्टिकपासून बनणारा पॉलिएस्टर लोक टाळू लागले आहेत. जर्मनीतील QMilk कंपनी फक्त वाया जाणारं किंवा खराब झालेलं दूध वापरते. युरोपमध्ये दरवर्षी 20 लाख टन दूध फेकलं जातं, तेच कपड्यात बदललं जातं.
मिल्क फॅब्रिकचे फायदे
रेशमापेक्षा 3 पट जास्त मऊ
अँटी-बॅक्टेरियल – घाम आला तरी दुर्गंध येत नाही
थर्मो-रेग्युलेटिंग – हिवाळ्यात उबदार, उन्हाळ्यात थंड
अॅलर्जी नसलेल्यांसाठी योग्य
100% नैसर्गिक आणि 2 वर्षात पूर्णपणे जमिनीत मिसळतं