पोलिसांना बघताच 'पोलीस पोलीस' ओरडू लागला ड्रग डीलरचा पोपट आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 17:09 IST2019-04-27T16:55:44+5:302019-04-27T17:09:15+5:30
पोलीस तिथे पोहोचताच बाहेर पिंजऱ्यात असलेला पोपट जोरजोरात, 'मम्मा पोलीस, मम्मा पोलीस...' असं ओरडू लागला.

पोलिसांना बघताच 'पोलीस पोलीस' ओरडू लागला ड्रग डीलरचा पोपट आणि....
आपल्या देशात अनेकांच्या घरात पोपट पाळतात. लोक या पोपटांना गोड गोड बोलायलाही शिकवतात. त्यामुळेच पोपट हा मनुष्यांसोबत सहज मिश्रित होणाऱ्या पक्ष्यांमध्ये गणला जातो. त्यांची खासियत म्हणजे एखादी गोष्ट लवकर आत्मसात करतात. खासकरुन बोलणं. पण आता पोपटांच्या या बोलण्याचा गुणाचा गैरवापर करणं ब्राझीलमधील ड्रग्स डीलर्सनी सुरु केलाय. पोलिसांनी अशाच एका पोपटाला पकडलंय.
ब्राझीलमध्ये पोलिसांनी नुकतीच एका ड्रग डीलरकडे धाड टाकली होती. पण पोलीस तिथे पोहोचताच बाहेर पिंजऱ्यात असलेला पोपट जोरजोरात, 'मम्मा पोलीस, मम्मा पोलीस...' असं ओरडू लागला. अर्थातच ड्रग डीलर्सनी या पोपटाला खासप्रकारचं ट्रेनिंग दिलं होतं. जेणेकरुन असा काही धोका असेल तर वेळीच त्यांना कळावं.
सद्या हा पोपट पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला एका प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलं आहे. पोलीस ज्या ठिकाणी धाड टाकयला गेले होते, तिथे एक महिला ड्रगचा धंदा करत चालवते. या महिलेला याआधी दोनदा पोलिसांनी ड्रग केसमध्ये अटक केली होती. आता यावेळी तिच्या पतीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ४ पॅकेट कोकेन जप्त केलंय.
कोलंबियामध्ये याआधी अशी घटना
२०१० मध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती. कोलंबिया पोलीस ड्रग्स डीलर्सच्या अड्ड्यांवर छापेमारीसाठी पोहोचली होती. तेव्हा तिथे असलेला पोपट जोरजोरात 'रन....रन...' असं ओरडू लागला होता. तरी सुद्धा पोलिसांनी या ठिकाणाहून २०० पेक्षा जास्त शस्त्रास्त्र आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केलं होता.