शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

बोंबला! चीनमध्ये महिला त्यांच्या पतींना खाऊ घालत आहेत नपुंसक होण्याचं औषध, पण का भौ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 2:54 PM

ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनमधील महिला त्यांच्या पतींना गपचूपपणे अशाप्रकारचं औषध देत आहेत ज्याने ते नपुंसक होतील आणि दुसऱ्या महिलांच्या मागे लागणार नाहीत

चीनमध्ये पतींकडून होणाऱ्या चिंटींग रोखण्यासाठी महिलांनी एक नवी आयडिया शोधून काढली आहे. ही आयडिया ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. पार्टनरने त्यांना दगा देऊ नये आणि दुसऱ्या महिलांच्या मागे लागू नये म्हणून काही महिला त्यांच्या पतींना काही औषधं देत आहेत. ही काही सामान्य औषध नाही तर पुरूषांना नपुंसक बनवणारं औषध आहे. ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनमधील महिला त्यांच्या पतींना गपचूपपणे अशाप्रकारचं औषध देत आहेत ज्याने ते नपुंसक होतील आणि दुसऱ्या महिलांच्या मागे लागणार नाहीत.

ग्लोबल टाइम्सनुसार, एका लेखातून समोर आले आहे की काही चीनी महिला त्यांच्या पतींच्या लपून त्यांना डायथाइलस्टीलबेस्ट्रोल देत आहेत. असे सांगितले जात आहे की, हे औषध एकप्रकारचं सिंथेटिक एस्ट्रोजन आहे ज्याने पुरूषांचं इरेक्शन होत नाही. याबाबतच्या अनेक गोष्टी चीनमधील सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. (हे पण वाचा : हसू आल्यावर आपोआप बेशुद्ध पडते ही महिला, दोन दुर्मीळ आजारामुळे झाली हैराण!)

WeChat वर प्रकाशित एका लेखानुसार, काही महिलांनी ऑनलाइन औषधे ऑर्डर केलीत. गुप्तपणे जेवण किंवा पेयातून आपल्या पतींना दिलं. असे सांगितले जात आहे की, हे औषध खाल्ल्यानंतर काही दगाबाज पतींनी आपल्या पत्नीला दगा देणं बंद केलं. या लेखात काही महिलांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या. यातील एका महिलेने हे औषध फायदेशीर असल्याचं सांगितलं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून या औषधाचं नाव कार्सिनोजन असल्याचं सांगितलं.

एका महिलेने सांगितले की, 'हे औषध मी जसं पतीला देणं सुरू केलं, दोन आठवड्यातच या प्रभाव दिसू लागला होता'. महिलेने दावा केला की, आता तिचा पती घरीच राहतो आणि चांगलाही वागतो. हा लेख सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून औषध गायब झालं आहे. अनेकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या औषधाचा शोध घेतला पण कुठेही मिळालं नाही. (हे पण वाचा : एक्स बॉयफ्रेन्डने सोशल मीडियावर केलं ब्लॉक, महिलेने सूड घेण्यासाठी प्रायव्हेट व्हिडीओ त्याच्या मुलीला पाठवले!)

जियाक्सिआंग मॉर्निंग हेराल्डनुसार, काही ठिकाणांवर अजूनही गुप्तपणे पांढऱ्या पावडरच्या रूपात हे औषध विकलं जात आहे. या औषधाला गंध नाही आणि ते लवकर पाण्यात विरघळतं. असे सांगितले जात आहे की, एका दुकानदाराने एका महिन्यात १०० पेक्षा जास्त लोकांना हे औषध विकलं. 

दुकानावर काम करणाऱ्यांनी दावा केला आहे की, हे औषध सामान्यपणे १५ दिवसात आपला प्रभाव दाखवतं. दिलासादायक बाब म्हणजे जसं हे औषध घेणं बंद केलं तर पुरूषाची इरेक्शनची क्षमता सामान्यपणे २१ दिवसात परत येते.तेच चीनमधील काही कायदेतज्ज्ञाचं मत आहे की, या महिलांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की, त्यांच्या पतीला जर काही शारीरिक हानी झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. असं औषध विकणाऱ्यांवर बंदी घालण्याचाही प्रयत्न केला गेला पाहिजे. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय