बोंबला! चहा पिण्यासाठी खरेदी केला 12 लाख रूपयांचा सोन्याचा स्ट्रॉ, रस्त्यात हरवला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:02 IST2025-10-25T10:00:01+5:302025-10-25T10:02:44+5:30
Viral News : शौ नावाचा हा माणूस चहाचा मोठा फॅन होता. त्यामुळे त्याने तो पिण्यासाठी सोन्याचा स्ट्रॉ बनवला होता.

बोंबला! चहा पिण्यासाठी खरेदी केला 12 लाख रूपयांचा सोन्याचा स्ट्रॉ, रस्त्यात हरवला आणि मग...
Viral News : आपण नेहमीच कुठेतरी वाचत किंवा ऐकत असतो की, चहा हे केवळ पेय नसून एक भावना आहे. जगभरात चहाचे मोठे शौकीन लोक आहेत. पण चीनमधील व्यक्तीसमोर ते सगळेच कमी शौकीन असतील. चीनमध्ये एका व्यक्तीला चहाची इतकी आवड आहे की, तो पिण्यासाठी त्याने 14, 000 डॉलर म्हणजे 12 लाख रूपयांचा सोन्याचा स्ट्रॉ तयार करून घेतला. पण एकदा बाइक चालत असताना त्याचा हा सोन्याचा स्ट्रॉ हरवला. अर्थातच त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण त्याला भिती होती की, जर हा स्ट्रॉ कुणाला सापडला तर त्याची पत्नी त्याला धडा शिकवेल.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, अशात या व्यक्तीनं स्ट्रॉ शोधण्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली. शौ नावाचा हा माणूस चहाचा मोठा फॅन होता. त्यामुळे त्याने तो पिण्यासाठी सोन्याचा स्ट्रॉ बनवला होता.
अशात नंतर दोन पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना जेव्हा समजलं की, या व्यक्तीनं चहा पिण्यासाठी सोन्याचा 100 ग्रॅमचा स्ट्रॉ बनवला तर तेही हैराण झालेत. तो पोलिसांना म्हणाला की, जर त्याला स्ट्रॉ सापडला नाही तर पत्नी त्याला शिक्षा देईल.
तसेच स्ट्रॉ बनवणाऱ्या व्यक्तीनुसार, शौ याने हा स्ट्रॉ बनवण्यासाठी 90,000 युआन दिले होते. पोलिसांना साधारण 30 मिनिटांच्या शोध मोहिमेनंतर एका मेनहोलजवळ हा सोन्याचा स्ट्रॉ आढळून आला. जो बघून शौ आनंदी झाला.
शौ म्हणाला की, तो गेल्या 10 वर्षांपासून सोने खरेदी करत आहे. तो त्याचा आवडीच्या दुधाच्या चहाचा आनंद घेण्यासाठी या स्ट्रॉ चा वापर करत होता. तेच शौ कडे एक चांदीचा स्ट्रॉ देखील आहे. दरम्यान, सोन्याचा स्ट्रॉ खाली पडून मोडला. शौ म्हणाला की, काही महिन्यांनी तो दुसरा स्ट्रॉ बनवून घेणार आहे आणि भविष्यात खिशात कधीच ठेवणार नाही.