कशा असतात लेबर पेनच्या वेदना? प्रेयसीनं प्रियकराला रुग्णालयात नेलं अन्...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:55 IST2025-03-03T13:53:03+5:302025-03-03T13:55:38+5:30
तरुणाचे आई-वडील संबंधित तरुणीवर नाराज असून तिच्यावर खटला भरण्याचा विचार करत आहेत.

कशा असतात लेबर पेनच्या वेदना? प्रेयसीनं प्रियकराला रुग्णालयात नेलं अन्...!
चीनमधून एक अजबच प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रसूती वेदनेचा अनुभव घेतला. मात्र याचा त्याला प्रचंड त्रास झाला. यामुळे त्याचा जीवही धोक्यात आला होता. संबंधित तरूणावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, तरुणाचे आई-वडील संबंधित तरुणीवर नाराज असून तिच्यावर खटला भरण्याचा विचार करत आहेत.
'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट' ने दिलेल्या एका वृत्तानुसार, येथील हेनान प्रांतातील एक तरुणी लग्नापूर्वी, आपल्या प्रियकराची टेस्ट घेण्यासठी त्याला एका लेबर पेन सिम्यूलेशन सेंटरमध्ये घेऊन गेली. संबंधित तरुणीने सोशल मीडियावर म्हटले आहे, "साखरपुड्यापूर्वी आपल्या प्रियकराने महिलांना सामना कराव्या लागणाऱ्या समस्यांचा अनुभव घ्यावा, अशी आपल्या आईची आणि बहिणीची इच्छा होती. महत्वाचे म्हणजे, तिच्या प्रियकाराने सुरुवातीला असे करण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर त्याने तिचे हे चॅलेन्ज स्वीकारले आणि प्रसुदी वेदनेचा अनुभव घेणयासाठी पोहोचला.
संबंधित व्यक्तीला इलेक्ट्रिक करंट दिले -
सेंटरमध्ये प्रियकराची स्किन आणि मसल्स उत्तेजित करण्यासाठी त्याला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले. यावेळी त्याने प्रसूतीदरम्यान होणाऱ्या गर्भाशयाच्या आकुंचनाचा त्रास अनुभवला. संबंधित तरुणीने सांगितले की, सुरुवातीच्या 90 मिनिटांत त्याच्यावेदना हळू हळू वाढल्या. यानंतर त्या अधिक झाल्या. माझा ब्वॉयफ्रेंड लेवल 8 ला ओरडू लागला आणि धडपडू लागला. लेव्हल १० वर तो ओरडू लागला आणि अखेर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर त्याला घाम यायला सुरुवात झाली आणि नतंर उलट्या होऊ लागल्या.
घटनेच्या एका आठवड्यानतंर, संबंधित तरुणाला प्रचंड पोटदुखी जाणवू लागली. यानंतर तो रुग्णालयात दाखल झला. यावेळी, तरुणाचे लहान आतडे दुखावले गेल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. संबंधित तरुणीने म्हटल्याप्रमाणे, तिच्या प्रियकराच्या आईने साखरपुड्यास नकार दिला असून खटल्याची तयारी चालवली आहे. तसेच, आपला प्रियकर बरा झाल्यानंतर आपण त्याची संपूर्ण जबाबदारी उचलू, असेही संबंधित तरुणीने म्हटले आहे." महिलेच्या या वर्तनानंतर सोशल मीडियावर युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.